शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

डाकीण म्हटल्याने धडगाव तालुक्यातील सोन येथे महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 9:08 PM

तपास सुरु : चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

नंदुरबार : गावातील महिलेस डाकीण म्हटल्याचा संशय घेत चौघांनी महिला आणि तिच्या पतीस शिवीगाळ केली होती़ यातून मनस्ताप झाल्याने महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी सोन खुर्द ता़ धडगाव येथे घडली़ याप्रकरणी चौघांविरोधात महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सोन खुर्द येथील जोमीबाई जामसिंग पावरा (४५) यांनी रोनीबाई दोडक्या पावरा यांनी डाकीण संबोधून गावात तशी बदनामी केल्याच्या संशय चंदू वाढऱ्या पावरा, लाला दिल्या पावरा, मांगल्या दिल्या पावरा आणि संजय दोढक्या पावरा यांना होता़ यातून त्यांनी जोमीबाई व त्यांचे पती जामसिंग यांना घरी जाऊन शिवीगाळ केली होती़ वारंवार त्यांच्याकडून हा त्रास होत असल्याने रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान जोमीबाई यांनी सोन खुर्द येथील घरी गळफास घेत आत्महत्या केली होती़ घटनेनंतर मयत जोमीबाई यांचे पती जामसिंग यांनी सोमवारी धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत चौघांच्या त्रासामुळे पत्नीने आत्त्महत्या केल्याचे म्हटले होते़ त्यानुसार चंदू पावरा, लाला पावरा, मांगल्या पावरा व संजय पावरा या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक दहिफळे करत आहेत़ दरम्यान या घटनेमुळे धडगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़मयत जोमीबाई यांचे पती जामसिंग हे धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ त्यांना दोन मुले आहेत़ संबधितांकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याने जोमीबाई कायम चिंतेत रहात होत्या़ यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलीसांचा अंदाज आहे़