कापसाच्या चोरीमुळे शेतक:यांची लागवडीसाठी ऊसाला पसंती
By Admin | Updated: June 12, 2017 12:52 IST2017-06-12T12:52:41+5:302017-06-12T12:52:41+5:30
तळोदा तालुक्यातील शेतक:यांनी घेतला निर्णय

कापसाच्या चोरीमुळे शेतक:यांची लागवडीसाठी ऊसाला पसंती
ऑनलाईन लोकमत
बोरद,दि.12 : शासनाने क्विंटलमागे ऊस दरांमध्ये केलेली वाढ आणि कापूस चोरांचा धुडगूस या दोन गोष्टींचा परिणाम यंदा तळोदा तालुक्यातील ऊस लागवडीवर झाला असून 10 हजार हेक्टर्पयत ऊस लागवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आह़े
तळोदा तालुक्यातील विविध भागात गेल्या काही वर्षात कापूस लागवडीचे प्रमाण वाढले होत़े मात्र कापूस लागवडीनंतर निर्माण होणा:या अनंत अडचणींमुळे शेतक:यांचे नुकसान होत होत़े हे नुकसान पेलवणार नसल्याने शेतक:यांनी यंदा ऊस लागवडीला पसंती दिली आह़े यामुळे तालुक्यात दिवसेंदिवस ऊस लागवड वाढत असल्याचे दिसून आले आह़े पावसाळ्यात उपलब्ध होणा:या पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी पिक संगोपनाचे नियोजन करणे सुरू झाले आह़े तालुक्यात वाढत्या ऊस क्षेत्रामुळे येत्या काळात कारखानदारांची वर्दळ तालुक्यात वाढणार आह़े