विद्यार्थ्यांनी मास्क लावून दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:11 IST2020-11-21T12:10:56+5:302020-11-21T12:11:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. परीक्षेसाठी जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या ...

विद्यार्थ्यांनी मास्क लावून दिली परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. परीक्षेसाठी जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या कंद्रांमध्ये कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून विविध उपायोजना करण्यात आल्या.
लोकमत ने शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता, शिक्षण विभागाकडून परीक्षेला येणा-या विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येवून मास्कची सक्ती करण्यात आल्याचे दिसून आले. प्रामुख्याने एक दिवस आधीच सर्व खोल्या सॅनेटाईज करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. परीक्षा सुरू होण्यापूर्वी झालेल्या तपासणीत एकही विद्यार्थीं कोरोनाने बाधित नसल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सुरळीत परीक्षा दिली.
काय आहेत उपाययोजना
परीक्षा केंद्रात प्रवेश करणा-या विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचा करण्यात आला होता. प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग करण्यावर भर देण्यात येत होता. परीक्षा केंद्रात सॅनेटायझर उपलब्ध करुन देण्यात आले होते. नंदुरबार शहरातील यशवंत हायस्कूल व डी.आर. हायस्कूलमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधीच तपासण्या सुरू करण्यात आल्या. वर्ग खोल्यांमध्ये एक बेंच सोडून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याचे दिसून आले होते. शिक्षक वेळोवेळी सोशल डिस्टिन्सिंग च्या सूचना करत होते.
नंदुरबार येथील डी.आर हायस्कुल, वसंतराव नाईक विद्यालय शहादा, न्यू इंग्लिश स्कुल अक्कलकुवा, पी.ए.सोढा सार्वजनिक हायस्कुल नवापुर या चार उपकेंद्रावर बारावी तर यशवंत विद्यालय, नंदुरबार व म्युनिसिपल स्कुल शहादा या दोन उपकेंद्रांवर दहावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे.