शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी तयार केले ‘कारागीर’ अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘कारागीर’ या नावाचे मोबाईल ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘कारागीर’ या नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. त्याची लॉन्चींग समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.धावपळीच्या काळात आपल्या दैनंदिन छोट्या-मोठ्या कामांसाठी कुशल व अकुशल कारागिर व सर्व्हिस प्रोव्हायडर्स याची आपणास गरज वाटत असते व ते सहजासहजी उपलब्ध नसतात. आपली हीच गरज ओळखून व कौशल्य विकास अभियानाला चालना मिळावी म्हणून, या सर्व घटकांना एकाच मंचावर आणण्याचा छोटेखानी प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेने प्रेरित होऊन डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी दर्शन पाटील, भूषण कोळी, प्रकाश सोनार यांनी आपल्या नंदुरबार जिल्हावासियांसाठी ‘कारागीर’ नावाचे एक सर्व्हिस प्रोव्हायडर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे.या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने आपण आपल्याला गरज असलेल्या सर्व प्रकारच्या कुशल व अकुशल कारागीरांशी व सर्व्हिस प्रोव्हायडरांशी ऐका क्लिकवर संपर्क साधु शकतात. कारागिर अ‍ॅप्लिकेशन आपल्याला खालील सर्व्हिसेस मिळवून देईल. यात प्लंबर, इलेक्ट्रीशियन, कारपेंटर, पेस्ट कंट्रोल, लोकल ट्रान्सपोर्ट आदींचा समावेश आहे. या अ‍ॅप्लिकेशनची लॉन्चिंग समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, प्राचार्य डॉ.डी.एम. पटेल, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार, प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, प्राचार्य बी.के. सोनी, प्लेसमेंट आॅफिसर प्रा.आर.एस. पाटील, संगणक विभाग प्रमुख प्रा.व्ही.एस. महाजन उपस्थित होते. हे अ‍ॅप्लिकेशन बनवण्यासाठी प्रा.विनय टी. पाटील आणि संगणक विभागाच्या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.