विद्यार्थीनीची छेडखानी करणा:या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:03 IST2019-08-28T12:03:17+5:302019-08-28T12:03:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाविद्यालयीन विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. 26 रोजी दुपारी येथील जीटीपी महाविद्यालय ...

विद्यार्थीनीची छेडखानी करणा:या दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाविद्यालयीन विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. 26 रोजी दुपारी येथील जीटीपी महाविद्यालय परिसरात हा प्रकार घडला. दरम्यान, संशयीतांपैकी एक अल्पवयीन आहे.
जयेश नारायण कोळी व एक अल्पवयीन बालक दोन्ही रा.मेहतर वस्ती, नंदुरबार असे संशयीतांची नावे आहेत. महाविद्यालयात जाणा:या एका विद्यार्थीनीच्या मागे हे दोघे गेल्या चार महिन्यांपासून लागले होते. विद्यार्थीनीच्या दुचाकीमागे जाणे, विचित्र हावभाव करणे असे प्रकार हे युवक करीत होते. विद्यार्थीनीने पालकांना ही बाब सांगितल्यानंतर पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे ठरविण्यात आले.
विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून जयेश नारायण कोळी व अल्पवयीन संशयीत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास महिला पोलीस उपनिरिक्षक योगिता पाटील करीत आहे.
दरम्यान, शाळा व महाविद्यालय परिसरात मोठय़ा प्रमाणावर टारगट युवकांनी उच्छाद मांडला आहे. पोलिसांचे निर्भया पथकाची गस्त वाढवावी व साध्या वेशातील पोलिसांचीही गस्त वाढवावी अशी मागणी विद्यार्थीनी व पालक वर्गातून करण्यात येत आहे.