विद्यार्थीप्रिय शिक्षिका हरपली..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:52 IST2019-08-20T12:52:33+5:302019-08-20T12:52:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : रविवारी रात्री औरंगाबाद-शहादा बसचा निमगूळजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात शहादा येथील व्हॉलंटरी प्राथमिक ...

विद्यार्थीप्रिय शिक्षिका हरपली..
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : रविवारी रात्री औरंगाबाद-शहादा बसचा निमगूळजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात शहादा येथील व्हॉलंटरी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका वृषाली दीपक भावसार यांचा मृत्यू झाला. विद्यार्थीप्रिय शिक्षिका हरपल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील लोकांनी व्यक्त केल्या.
आपल्या प्रिय शिक्षिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या आवडत्या शिक्षिकेला निरोप देताना विद्याथ्र्यानी एकच हंबरडा फोडला. आपल्या लाडक्या शिक्षिका आता वर्गात कधीच आपल्याला शिकवायला येणार नाही याची जाणीव झाल्याने सर्वच विद्यार्थी खूप रडत होते. मॅडम आम्हाला आता कोण शिकवेल, आम्हाला आता कोण रागवेल, आमच्यावर कोण प्रेम करेल, मॅडम परत या ना जाऊ नका ना आम्हाला सोडून, असा हंबरडा लहान-लहान विद्यार्थीदेखील फोडत होते.
अतिशय शिस्तप्रिय व मनमिळावू शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या. रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांच्या मृत्युची वार्ता शहरासह शाळेत दाखल झाली. सकाळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना ही घटना समजल्याने ते काही काळ स्तब्ध झाले होते. एकाचवेळी शहरातील अमरधाममध्ये मृत्युमुखी झालेल्या पाच लोकांवर अंत्यसंस्कार करताना तेथे जमलेल्या अनेकांना रडू कोसळले.