एस.टी.ची रातराणी रिकामी, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST2021-07-12T04:19:41+5:302021-07-12T04:19:41+5:30

संध्याकाळी सात ते पहाटे पाच यादरम्यान रातराणी धावते. यांचे दर लालपरीच्या तुलनेत जास्त आहेत. तरीदेखील याला प्रवाशांच्या प्रतिसाद पूर्वी ...

ST's overnight empty, travels housefull | एस.टी.ची रातराणी रिकामी, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल

एस.टी.ची रातराणी रिकामी, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल

संध्याकाळी सात ते पहाटे पाच यादरम्यान रातराणी धावते. यांचे दर लालपरीच्या तुलनेत जास्त आहेत. तरीदेखील याला प्रवाशांच्या प्रतिसाद पूर्वी चांगला मिळत होता. विशेषत: मुंबई, नाशिक, पुणे मार्गावर मात्र आता रातराणीची अवस्था बिकट आहे. ज्या काही रातराणी धावत आहेत त्याला अल्प प्रतिसाद लाभत आहे. कोविडच्या आधी शहादा आगारातून शहादा-पुणे व शहादा-मुंबई या दोन स्लीपर कोच शिवशाही बसेस धावत होत्या. मात्र, त्यावेळीही पाहिजे तसा प्रतिसाद या बसेसना भेटला नाही.

शहादा शहरात ट्रॅव्हल्सला मोठा प्रतिसाद

शहादा शहरातून रोज शहादा ते पुण्यासाठी सहा ट्रॅव्हल्स धावतात तर शहादा ते मुंबईसाठी तीन ट्रॅव्हल्स धावतात. एस.टी.च्या तुलनेत प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याला अधिक पसंती देताना दिसून येत आहेत.

एस.टी.कडे एकही स्लीपर नाही

कोविडच्या आधी शहादा आगाराकडे खासगी ठेकेदाराच्या दोन स्लीपर कोच शिवशाही बसेस उपलब्ध होत्या. शहादा ते पुणे व शहादा ते मुंबई या मार्गावर दोन्ही बसेस धावत होत्या. मात्र, आता त्या बसेस उपलब्ध नसल्याने साध्या बसेस या मार्गावर धावत आहेत.

या मार्गावर सुरू असलेल्या दोन्ही स्लीपर कोच बसेसला पाहिजे तसा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळाला नाही. सीजनमध्येदेखील प्रवाशांनी या बसमधून प्रवासाकडे पाठ फिरवली.

एस.टी.च्या सुरू असलेल्या रातराणी

शहादा-पुणे, पुणे-शहादा, शहादा-मुंबई, मुंबई-शहादा

एसटीपेक्षा तिकीट जास्त तरीही गर्दी

एस.टी. पेक्षा ट्रॅव्हल्सचे तिकीट जास्त असते ते वेळोवेळी कमी-जास्तदेखील होते. त्या तुलनेत एस.टी.चे तिकीट स्थिर असूनदेखील प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यास प्राधान्य देताना दिसून येत आहेत. ट्रॅव्हल्स स्लीपर कोच असल्याने आरामदायी प्रवास होत असल्याने प्रवाशांचा कल ट्रॅव्हल्सकडे असतो.

सध्या एस.टी. आगारातून साध्या बस धावत आहेत. त्या तुलनेत स्लीपर कोच असलेल्या ट्रॅव्हल्सने आरामदायी प्रवास होतो व आता भाडे स्थिर असल्याने पुणे जाण्यासाठी आम्ही ट्रॅव्हल्सला प्राधान्य देत आहोत. -जयेश डी. शिंदे, प्रवाशी, पुणे

मुंबई व पुणे जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत आहे. एसटीचे भाडे स्थिर असते म्हणून आर्थिक पिळवणूक होत नाही. दुसरीकडे मात्र लॉकडाऊन काळात ट्रॅव्हलचे मालक मनमानी पद्धतीने भाडे आकारत होते. लोकांना गरज असल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांकडून मोठी आर्थिक पिळवणूक होत होती. - सुमित तमखाने, प्रवाशी पुणे

Web Title: ST's overnight empty, travels housefull