शेती वाटणीच्या वादातून रजाळेत मारहाण व विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 12:21 IST2018-10-30T12:21:15+5:302018-10-30T12:21:19+5:30

नंदुरबार : शेतीच्या वाटणीच्या वादातून झालेल्या हाणामारीत जमावाने महिलेस व तिच्या पतीला जबर मारहाण केल्याची घटना रजाळे, ता.नंदुरबार येथे ...

Struggling and molestation in the field of farming dispute | शेती वाटणीच्या वादातून रजाळेत मारहाण व विनयभंग

शेती वाटणीच्या वादातून रजाळेत मारहाण व विनयभंग

नंदुरबार : शेतीच्या वाटणीच्या वादातून झालेल्या हाणामारीत जमावाने महिलेस व तिच्या पतीला जबर मारहाण केल्याची घटना रजाळे, ता.नंदुरबार येथे घडली. महिलेच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
रजाळे येथील कृष्णा वाघ व दुर्योधन वाघ यांच्यात शेती वाटणीचा वाद होता. त्यावरून त्यांच्यात याआधी भानगड देखील झाली होती. त्याच वादातून 27 ऑक्टोबर रोजी रात्री पुन्हा भाडण झाली. जमावाने कृष्णा वाघ यांच्या घरी जावून त्यांना व त्यांच्या प}ी यांना बेदम मारहाण केली. लाठय़ा, काठय़ा व हाताबुक्यांनी मारहाण केली. 
महिलेशी छेडछाड करून शिविगाळ करीत विनयभंग देखील केला. महिलेच्या फिर्यादीवरून दुर्योधन झगा वाघ, रत्नाबाई दुर्योधन वाघ, किरणबाई दुर्योधन वाघ रा.रजाळे, ज्ञानेश्वर पंडित पानपाटील, रावसाहेब पंडित पानपाटील, पंडित रुपला पानपाटील रा.बलवंड यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात               गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सोनवणे करीत आहे.
 

Web Title: Struggling and molestation in the field of farming dispute