शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या पहिल्याच रात्री चोरट्यांची जोरदार सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंगळबाजारातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी हजारोंचा ऐवज चोरून नेला. याशिवाय याच भागातील तीन ते ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मंगळबाजारातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी हजारोंचा ऐवज चोरून नेला. याशिवाय याच भागातील तीन ते चार दुकानांमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. लॉकडाऊनच्या पहिल्याच रात्री चोरट्यांनी दिलेली सलामी पोलिसांना आव्हान ठरली आहे.
मंगळबाजार व्यापारी संकुलात विविध वस्तू विक्रीची दुकाने आहेत. त्यातील ओळीने तीन दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी चोरी केली. प्रकाश गुरुबक्षाणी यांचे प्रकाश किराणा दुकानातून चोरट्यांनी तेलाचे डबे, ५० किलो साखर, रोख रक्कम लंपास केली. शेजारच्या महेंद्र चौधरी यांच्या किराणा दुकानातून देखील चोरट्यांनी मसाल्याचे पाकिटे, खोबरेल तेल व इतर साहित्य चोरून नेले. शेजारील कलीम पटवे यांच्या कटलरी दुकानातून नेकलेस, पावडर, मंगळसूत्र व इतर सामान चोरून नेला. मोहम्मद बोहरी यांच्या जडीबुटी दुकानातून देखील चोरीचा प्रयत्न झाला.
गंगाबाई तांबोळी यांच्या पान दुकानातूनही काही मिळते का याचा प्रयत्न चोरट्यांनी करून पाहिला. याशिवाय इतर दोन दुकानांकडेही त्यांनी चाल केली. सकाळी चोरी झाल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
हजारोंचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. रात्री उशीरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लॉकडाऊनमध्ये किराणा सामानाची तजबीज करून चोरट्यांनी पोलिसांना कडक सलामी दिल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.