बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:40+5:302021-02-06T04:58:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोपर्ली येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा दहिंदुले येथील आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने चार ...

Strict imprisonment for abusing a girl child | बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावास

बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावास

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : कोपर्ली येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा दहिंदुले येथील आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने चार वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

शैलू हिरामण भील, रा.दहिंदुले, ता.नंदुरबार असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची हकिकत अशी, ३० डिसेंबर २०१७ रोजी शैलू हा आपल्या आपल्या आई वडिलांसोबत कोपर्ली येथे यात्रेसाठी गेला होता. रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास अत्याचारित बालिका ही शौचास गेली असता शैलू याने बालिकेचे तोंड दाबून गोठ्यात नेऊन अत्याचार केला. बालिकेने त्याच्यातून स्वत:ला त्याच्या ताब्यातून सोडवून घेत झालेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. दुसऱ्या दिवशी बालिकेच्या वडिलांनी शैलू भील यास जाब विचारला असता त्याच्या वडिलांनी आमचा मुलगा असे करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे सांगत धमकी दिली. त्यानंतर बालिकेचे वडिल यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून शैलू भील याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयीताविरुद्ध उपनिरिक्षक जी.व्ही.सानप यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आशुतोष भागवत यांच्यासमोर हा खटला चालला. साक्षी, पुरावे पहाता न्या.भागवत यांनी शैलू भील यास चार वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड.व्ही.सी.चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक नितीन साबळे व गिरिष पाटील होते.

Web Title: Strict imprisonment for abusing a girl child