मंदाणा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST2021-07-15T04:21:59+5:302021-07-15T04:21:59+5:30
निवेदनात, मंदाणा येथील संशयित विश्वास रूपचंद पाटील याने पीडित मुलगी ही घरी लहान भावंडांचा सांभाळ करीत असताना तिचा ...

मंदाणा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी
निवेदनात, मंदाणा येथील संशयित विश्वास रूपचंद पाटील याने पीडित मुलगी ही घरी लहान भावंडांचा सांभाळ करीत असताना तिचा विनयभंग केला. यावेळी मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न संबंधिताकडून केला गेला. मुलीचे आई-वडील हे मोलमजुरी करून गुजराण करतात. जिल्ह्यात दिवसेंदिवस लहान मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दरम्यान, घटनेतील गुन्हेगाराला अटक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु संशयित आरोपी आजारपणाचा बहाणा करून दवाखान्यात ॲडमिट असल्याचे समजते. शासन-प्रशासनाने आदिवासींची दिशाभूल करू नये आणि आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा संतप्त आदिवासी समाज तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा आदिवासी एकता परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी सुभाष नाईक, तालुका सचिव संतोष पावरा, दीपक ठाकरे, सीताराम भिलावे, अजय सोनवणे आदी उपस्थित होते.