पशुवैद्यकीय दवाखान्याचे दरवाजेच नेले चोरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 21:26 IST2021-01-10T21:26:47+5:302021-01-10T21:26:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरट्यांनी साडेपाच हजार रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली. किंमती ...

पशुवैद्यकीय दवाखान्याचे दरवाजेच नेले चोरून
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरट्यांनी साडेपाच हजार रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली. किंमती साहित्य न मिळाल्याने सागवानी दरवाजे काढून चोरट्यांनी पोबारा केला.
शहादा येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी ७ जानेवारी रोजी दवाखान्याचे चार दरवाजे, दोन पंखे व दोन खुर्ची घेऊन पोबारा केला. त्यांची एकुण किंमत साडेपाच हजार रुपये आहे. ८ रोजी सकाळी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी सुभाष पाटील हे दवाखान्यात गेेले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत सुभाष पाटील यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार परदेशी करीत आहे.