अनुप मंडलवर कारवाईसाठी तळोदा तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST2021-06-05T04:22:52+5:302021-06-05T04:22:52+5:30
निवेदनात म्हटले आहे की, जैन समाज हा शांतीप्रिय व अहिंसावादी समाज आहे, तसेच जैन समाजाचे साधुसंत हे महावीर भगवान ...

अनुप मंडलवर कारवाईसाठी तळोदा तहसीलदारांना निवेदन
निवेदनात म्हटले आहे की, जैन समाज हा शांतीप्रिय व अहिंसावादी समाज आहे, तसेच जैन समाजाचे साधुसंत हे महावीर भगवान यांचे अनुयायी मानले जातात व जैन धर्माचे साधू हे नेहमी समाजाला शांततेचा, अहिंसेचा व जीव दया संदेश देतात. अनुप मंडल हे राजस्थानमधील सिरोही येथील नोंदणीकृत मुख्य कार्यालय असून अमृत प्रजापती हे त्याचे प्रमुख आहेत व ते जैन समाजावर व त्यांच्या साधुसंतांवर अप्रमाणित आक्षेप करीत आहेत. अनुप मंडल हे केवळ जैन समाजासाठी व संपूर्ण हिंदू सनातन धर्मावर आक्षेप करत असतात. जनहित कारिणी नावाचे पुस्तक जे न्यायालयाने त्यावर प्रतिबंध लावलेले असूनदेखील अनुप मंडल त्याचा प्रचार-प्रसार करीत असतात. अनुप मंडल हे जैन धर्मविरोधी संघटन आहे. जे राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व उत्तर प्रदेश मधील ग्रामीण भागांमध्ये जैन साधू, साध्वी यांच्याविरुद्ध चुकीचा प्रसार करून धार्मिक भावनांना तडा जाईल, असे कार्य करत आहे. हिंदू धर्माचा प्रमुख ग्रंथ गीता यासदेखील अनुप मंडल बदनाम करत आहे. अशाप्रकारे अनुप मंडल हे संपूर्ण जैन व हिंदू समाजाच्या भावना दुखवित आहे. म्हणून जैन समाज आता जर अनुप मंडलने आपले असे कार्य थांबवले नाही तर आंदोलन करण्यासही तयार आहे. म्हणून अनुप मंडलविरुद्ध उचित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर कीर्तिकुमार शाह, दिलीपकुमार जैन, गौतमचंद जैन, चंपालाल जैन, नरेश जैन, धनराज जैन, शांतीलाल जैन, ॲड. अल्पेश जैन, खुशालचंद जैन, मेघराज जैन, राजेंद्र जैन, विजयकुमार जैन, कांतीलाल जैन, घिसूलाल जैन, दिलीप जैन, भुरमल जैन, राजमल जैन, मुकेश जैन, प्रकाश जैन, प्रवीण जैन, मनोज सेठीया, दिनेश बोहरा, गोरज कोचर, अल्पेश देसाई, वर्धमान जैन, डॉ. संदीप जैन, हुकूमचंद जैन, डॉ. जिग्नेश देसाई, हंसकुमार जैन, उमेश जैन, जयंतीलाल जैन, डॉ. पंकज जैन, महावीर जैन, मांगीलाल जैन, तुनकरण जैन, मुकेश जैन, नीलेश जैन, पारस जैन, नीमेश देसाई, अमित कोचर, जयंतकुमार देसाई, जैनम जैन यांच्यासह जैन बांधवांच्या सह्या आहेत.