शहादा मुस्लिम खाटीक समाजातर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:40+5:302021-07-14T04:35:40+5:30

याबाबत मुस्लिम खाटीक समाज उन्नती मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक शहादा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले ...

Statement to Police Inspector on behalf of Shahada Muslim Killer Society | शहादा मुस्लिम खाटीक समाजातर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन

शहादा मुस्लिम खाटीक समाजातर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन

याबाबत मुस्लिम खाटीक समाज उन्नती मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक शहादा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जळगाव येथील जावेद रज्जाक खाटीक हे टेम्पोने बोकड व शेळ्या विक्रीसाठी कल्याण येथे जात असताना मालेगाव जवळ त्यांच्यावर लुटमारीच्या उद्देशाने दरोडेखोरांनी गोळीबार केला. त्यात ते ठार झाले असून त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा व्हावी. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे याबाबतची मागणी व भावना पोहोचवावी. या घटनेचा शहादा तालुका खाटीक समाजातर्फे निषेध व्यक्त करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मुस्लिम खाटीक समाज उन्नती मंडळ शहादाचे अध्यक्ष इरफान बशीर खाटीक, उपाध्यक्ष हाजी युनूस अब्दुल सलाम खाटीक, सचिव हाजी हारूण हाजी दगा खाटीक, संचालक प्रा. मेहमूद गुलाब खाटीक, हाजी मकसूद गफ्फार खाटीक, अल्लाउद्दीन नबी खाटीक, मुनाफ शेख गुलाब खाटीक, नवाब सरदार खाटीक, हाजी महेमूद नबी खाटीक, सलीम भिकन खाटीक, सलीम बशीर खाटीक, सलीम शरफोद्दीन खाटीक, हारून नबाब खाटीक, मुश्ताक नामदार खाटीक, लियाकत गफूर खाटीक, मेहमूद गुलाब खाटीक आदींची स्वाक्षरी व नावे आहेत.

Web Title: Statement to Police Inspector on behalf of Shahada Muslim Killer Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.