‘ढोल’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:20 PM2019-11-19T12:20:17+5:302019-11-19T12:20:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लक्कडकोट येथील कवी संतोष पावरा यांच्या ‘ढोल’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात प्रतापभाऊ ...

State level award for 'Dhol' poetry collection | ‘ढोल’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

‘ढोल’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील लक्कडकोट येथील कवी संतोष पावरा यांच्या ‘ढोल’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात प्रतापभाऊ राज्यस्तरीय युवा साहित्यिक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
भडगाव (वडजी) येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुनील गायकवाड, उद्घाटक प्रभू राजगडकर, ज्येष्ठ कवी वाहरू सोनवणे, डॉ.वाल्मिक अहिरे, नजूबाई गावीत, डॉ.पुष्पा गावीत यांच्या उपस्थितीत संतोष पावरा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘ढोल’ या काव्यसंग्रहात 31 मराठी, चार हिंदी तर 17 कविता पावरी बोलीभाषेत  आहेत.   यापूर्वीही ‘ढोल’ काव्यसंग्रहाला अकोले येथील फडकी फाऊंडेशनचा डॉ.गोविंद गारे आदिवासी साहित्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. काव्यसंग्रहातील 10 पावरा बोलीभाषेतील कविता भारत सरकार साहित्य अकादमी दिल्लीच्या ‘आदिवासी बोलीभाषा साहित्य प्रकाशन’ उपक्रमात समाविष्ट आहेत. गांधीनगर येथील विश्व विद्यालयात अरुणा जोशी ह्या भारतातील 17 लेखकांच्या साहित्यकृतीवर पीएच.डी. करीत असून त्यात कवी संतोष पावरा यांच्या ‘ढोल’ काव्यसंग्रहाचाही सहभाग आहे. 
 

Web Title: State level award for 'Dhol' poetry collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.