शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

निधी वळवत घाटरस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:56 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सहा महिन्यांपूर्वी तुटलेल्या चांदसैली घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला नाही. परंतु दुर्गम भागातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सहा महिन्यांपूर्वी तुटलेल्या चांदसैली घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला नाही. परंतु दुर्गम भागातील नागरिकांची समस्या लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अन्य कामाचा काही अंशी निधी वळवत कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम मार्चएण्ड पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे.जिल्ह्यात धडगाव ते तळोदा हा रस्ता चांदसैली घाटामुळे सर्वाधिक अवघड ठरतो. त्यामुळे या मार्गावरुन केवळ लहान वाहतुकच सुरू करण्यात आली होती. त्यातही मिनीबस सेवेला हा रस्ता काही अंशी अनुकुल ठरत असल्यामुळे नंदुरबार आगारामार्फत मिनी बस देखील सुरू करण्यात आली.या बससेवेमुळे दुर्गम भागातील सर्व प्रवाशांना हा मार्ग सोयीचा ठरत होता. जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी तेथील नागरिकांना हाच मार्ग परवडत असल्यामुळे प्रवाशांची संख्या देखील मोठी होती. तर या प्रवास सेवेतून नंदुरबार परिवहन आगाराला मोठे उत्पन्न देखील मिळत होते. परंतु जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदसैली या मार्गावर ठिकठिकाणी रस्ता तुटला शिवाय वाहूनही गेला. त्यामुळे या रस्त्यावरुन होणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे या मार्गावरुन होणारी वाहतुक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा उपविगाभामार्फत नंदुरबार परिवहन आगाराला बससेवा बंद करण्याचे पत्र देण्यात आले होते, त्यानुसार सेवा बंद करण्यात आली.हा रस्ता लवकरच दुरुस्त होऊन बससेवाही सुरू होईल अशी अपेक्षा दुर्गम भागातील प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली होती. परंतु सहा महिन्यांनंतरही रस्ता दुरुस्त झाला नसल्यामुळे बससेवा बंदच ठेवण्यात आली. या बंद सेवेचा सर्वाधिक फटका दुर्गम भागातील प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्याशिवाय नंदुरबार आगाराच्या चारही बसरफेऱ्यांमुळे या नियमित ये-जा करणाºया कर्मचाºयांना सोयीच्या ठरत होत्या. परंतु त्यांनाही खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.प्रवाशांची ही समस्या लक्षात घेत सार्वजनिक बांधकामच्या तळोदा उपविभागामार्फत तातडीने उपाययोजना करण्यात आली आहे. चांदसैली मंदिराजवळ तुटलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी निधी मंजूर झाला नाही. परंतु बांधकाम विभागाने अन्य कामाचा काही अंशी निधी वळवत कामाला सुरुवात करण्यात आली आहे.हे काम येत्या मार्चअखरपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे तळोदा उपविभागाचे शाखा अभियंता पी. जे. वळवी यांनी सांगितले. त्यामुळे बंद मिनीबस सेवा एप्रिलमध्येच सुरुहोण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपासून बस सेवेच्या प्रतिक्षेतील दुर्गम भागातील प्रवाशांना पुन्हा दोन महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.

तळोदा ते धडगाव या मार्गावर सार्वजनिक बांधकामच्या तळोदा उपविभागाची हद्द चांदसैली येथील मंदिरापर्यंतच आहे. या हद्दीच्या अगदी टोकावरच दोन ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी निधी द्यावा म्हणून प्रस्ताव सादर करण्यात आला परंतु मंजूर झाला नसल्याने तळोदा बांधकाम उपविभागासमोर अडचणी निर्माण झाल्या. परंतु त्यातही या विभागाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.तळोदा उपविभाग हद्दीत तुटलेल्या रस्त्यावर ४० व ३० मिटर असे एकुण ७० मिटरची सरक्षक भिंत बांधण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही कामांसाठी अंदाजे ३० ते ३७ लाखाच्या निधीची आवश्यकता भासत असून हा निधी अन्य कामातून वळविण्यात येत आहे.धडगाव बांधकाम उपविभागात उखळीआंबा येथे दोन तर गौऱ्या येथील नदीवरील पुलाच्या ठिकाणी असे तीन ठिकाणी रस्ता तुटला आहे. तळोदा हद्दीतील रस्ता दुरुतीसह धडगाव हद्दीतील कामासाठीही प्रस्ताव सादर करण्यात आले. परंतु दोन्ही प्रस्तावांना मंजूर मिळाली नसल्याने सहा महिन्यांपासून या मार्गावर बससेवा बंद आहे.गरज ओलखून तळोदा उपविभागाने मार्ग काढला. तसा मार्ग धडगाव विभागामार्फतही सुरू आहे.