सरदार सरोवरातील पिंजरा पद्धतीने मासेमारी प्रकल्प सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:13 IST2019-06-15T12:13:34+5:302019-06-15T12:13:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील खर्डी येथे सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत पिंज:यातील मत्स्य संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादन घेण्याचा ...

Start the fishing project on the Sardar Sarovar cage system | सरदार सरोवरातील पिंजरा पद्धतीने मासेमारी प्रकल्प सुरु

सरदार सरोवरातील पिंजरा पद्धतीने मासेमारी प्रकल्प सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील खर्डी येथे सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत पिंज:यातील मत्स्य संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादन घेण्याचा शुभारंभ नर्मदा सरोवर प्राधिकरणचे सल्लागार डॉ़ अफरोज अहमद यांच्याहस्ते करण्यात आल़े       
यावेळी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे सहसचिव श्यामसुंदर पाटील, मुख्य वनसंरक्षक अमित कळसकर, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद नाईक, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अजिंक्य पाटील, सहाय्यक आयुक्त किरण पाडवी आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमात बोलताना डॉ़ अहमद यांनी सांगितले की, नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकास व सहकारी मच्छिमार संस्थेच्या सहकार्याने सुरु झालेली पिंजरा पद्धत मासेमारीचा उपक्रम देशासाठी पथदर्शी ठरून या भागातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. आगामी काळात हा परिसर गेम फिशिंग आणि इको टुरिझमचा भाग होईल़ नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांना वरदान ठरला आहे. महाराष्ट्राच्या वाटय़ाला 70 किलोमीटर चे बॅकवॉटर आले आहे. या पाण्याचा पिंजरा पद्धतीने मत्स्य पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ नदीच्या पाण्यात मासे जीवंत राहणे म्हणजे पाणी शुद्ध असल्याचे निदर्शक आहे.
नर्मदा नदीच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाची संधी उपलब्ध झाली असून या भागात कृषी महोत्सवाप्रमाणेच मत्स्य महोत्सव आयोजित करावेत, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी बगाटे यांनी केली. 
डॉ. वर्तक यांनी सांगितले की,  कृषी विद्यापीठ व मत्स्य व्यवसाय विभागाचा हा पहिलाच क्षेत्रीय प्रयोग यशस्वी झाला असून तो यापुढे ही शाश्वत पद्धतीने सुरू ठेवावा. हा प्रयोग आव्हानात्मक होता. मात्र, सांघिक कार्य केल्याने तो यशस्वी झाला. त्यासाठी ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.
कार्यक्रमात माहिती देताना मस्त्य विभागाचे सहायक आयुक्त नाईक यांनी  मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून राज्यात तीन हजार पिंजरे देण्यात आले असून आगामी काळात मत्स्य विक्री साठी स्कुटी देण्यात येणार असल्याची माहिती दिली़ वनविभागाच्या अधिका:यांनी यावेळी परिसरातील विकास कामांची माहिती दिली़ कार्यक्रमात स्थानिक आदिवासी बांधवांनी उपस्थिती देत माहिती जाणून घेतली़ 
प्रकल्पामुळे विस्थापित होणा:या आदिवासी बांधवांना 4 हजार 200 हेक्टरचे जंगल, मूलभूत सोयी आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आदिवासी बांधवांना मत्स्य व्यवसाय सुरू करून रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे अफरोज अहमद यांनी सांगितल़े त्यामुळे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यासाठी राज्य शासनाचे महसूल, मदत व पुनवर्सन विभागाने योग्य ते सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितल़े  आगामी काळात हा मत्स्य व्यवसाय प्रकल्प देशाला मार्गदर्शक ठरुन रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल. या भागांत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली़ 

Web Title: Start the fishing project on the Sardar Sarovar cage system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.