शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या खर्चावरुन पालिकेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत्या काळात शहरात येणाºया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिकेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत्या काळात शहरात येणाºया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठी पालिकेने खर्च देण्याच्या मुद्द्यावरुन सर्वसाधारण सभेत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये जुंपली होती़ या गदारोळातच १० विषयांना मंजूरी देण्यात आली़पालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्षा भारती राजपूत होत्या़ पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ़ बाबूराव बिक्कड होते़ सभेत विषयांना मंजूरी दिली जात असताना विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंदुरबार दौºयावर येणार असल्याने त्या कार्यक्रमासाठी येणाºया सभांव्य खर्चास मंजूरी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला़ यावर भाजपाच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांच्या दौºयाचा खर्च हा शासन करते, पालिकेने त्यावर खर्च करण्याची सध्याची स्थिती नाही़ याउलट पालिकेने नागरिकांची घरपट्टी माफ करावी, संबधित विकास कामांचा ठेका घेणाºया ठेकेदाराने हा खर्च करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली़ यावर सत्ताधारी काँग्रेसने सूचना मान्य असल्याचे सांगत विषयाला मंजूरी दिली़दरम्यान पालिकेच्या सभेत २०२०-२०२१ या वर्षात पाणी पुरवठा करणाºया पाईप लिकेज दुरुस्ती करण्यासाठी तसेच पाणी पुरवठा विभागाकडील इतर कामे करण्यासाठी ठेकेदार नियुक्त व खर्चा मंजूरी देण्याच्या विषयावरही भाजपाच्या सदस्यांनी आक्षेप घेत सहा वर्षांपासून लिकेजचा ठेका एकाच ठेकेदाराला देऊन कामे होत नसल्याचा आरोप केला़सभेत बांधकाम समिती सभापती दिपक दिघे, नगरसेवक परवेज खान, किरण रघुवंशी, मोहितसिंग राजपूत, सभापती कैलास पाटील, भाजपा गटनेते अ‍ॅड़ चारुदत्त कळवणकर, नगरसेवक गौरव वाणी यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती़सभेत नगरपालिकेच्या नियोजित मॉँ-बेटी उद्यानात सौंदर्यीकरण व सुशोभिकरणांतर्गत महिलांचे १० पूर्णाकृती पुतळे उभारण्यास मंजूरी देण्याबाबत चर्चा करण्यात आली़ या चर्चेत सहभागी होताना नगरसेवकांनी दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि स्वातंत्र्यसेनानी कमलताई मराठे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारावेत अशी मागणी करण्यात आली़ यामागणीवर विचार करुन लवकरच पालिका याबाबत अधिकृत कार्यवाही सुरु करणार असल्याची माहिती उपस्थितांना सभेत देण्यात आली़ पालिकेची सभा संपल्यानंतर प्रभारी नगराध्यक्षा भारती राजपूत यांच्याहस्ते शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना नगरपालिकेन्च्यावतीने तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले़श्रीराम नगर-२ आणि नमस्कार कॉलनीतील रस्ते मजबूतीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामासाठी २० लाख ७० लाख ५९९ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्याचा ठराव पारित झाला़झराळी येथील दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रासाठी २०२०-२०२१ या वर्षात लागणारे ब्लिचिंग पावडर, तुरटी, क्लोरीन, लिक्विड गॅस टनर खरेदी करण्याच्या खर्चास मंजूरी देण्यासह वार्षिक दर मागण्याबाबत विचार विनिमय करणे़४पाणी पुरवठा विभागातील ईलेक्ट्रीक मोटारी दुरुस्ती खर्च, नवीन मोटारींची खरेदी, दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप, सेवानिवृत्ताच्या जागी वारसाची नियुक्ती करणे तसेच पालिकेच्या प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदार नियुक्त करण्यास मंजूरी देण्यात आली़