दारुडया बापाचा मुलाने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:04 IST2020-05-03T13:04:39+5:302020-05-03T13:04:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दारुड्या बापाला कंटाळलेल्या मुलाने बापाच्या डोक्यात लाकडी दंडुका टाकून ठार केल्याची घटना डाबचा देवकेलीपाडा, ...

The son of a drunken father committed murder | दारुडया बापाचा मुलाने केला खून

दारुडया बापाचा मुलाने केला खून

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दारुड्या बापाला कंटाळलेल्या मुलाने बापाच्या डोक्यात लाकडी दंडुका टाकून ठार केल्याची घटना डाबचा देवकेलीपाडा, ता.अक्कलकुवा येथे २९ रोजी घडली. मारेकरी मुलाला अटक करण्यात आली आहे.
जात्र्या मारग्या वसावे (६५) असे ठार झालेल्याचे नाव असून बोडा जत्र्या वसावे असे संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, बोंडा वसावे यांचे वडिल जात्र्या वसावे यांना दारूचे सेवन होते. वारंवार दारू पिऊन घरी येणे यामुळे बोंडा हा त्रासला होता. २९ रोजी जात्र्या वसावे हे नेहमीप्रमाणे दारू पिऊन सायंकाळी घरी आले.
आधीच कंटाळलेला बोंडा याला ते असह्य झाल्याने रागाच्या भरात त्याने त्याच्या जवळ असलेल्या लाकडी दांडक्याने जात्र्या वसावे यांच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमी जात्र्या यांना स्थानिक सरकारी रुग्णालय आणि तेथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ३० रोजी त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत जंगल्या जात्र्या वसावे यांनी फिर्याद दिल्याने बोंडा वसावे यांच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोंडा यास अटक करण्यात आली असून तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपास फौजदार राजेश पाटील करीत आहे. या घटनेमुळे परिसरातील खळबळ उडाली आहे.

Web Title: The son of a drunken father committed murder