शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त गावासाठी एकवटले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : आदिवासींमधील मौखिक अख्यायिकांप्रमाणे आदिवासींचे दैवत राजापांठा यांच्याद्वारे आत्मसात केलेली गुणकारी तथा आयुर्वेदिक मोहाची दारू ...

लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : आदिवासींमधील मौखिक अख्यायिकांप्रमाणे आदिवासींचे दैवत राजापांठा यांच्याद्वारे आत्मसात केलेली गुणकारी तथा आयुर्वेदिक मोहाची दारू कालपरत्वे रसायनयुक्त झाल्याने मानवी शरीरास अत्यंत घातक ठरत आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीची गरज भासू लागली आहे. त्यानुसार नर्मदानगर ता. तळोदा येथील ग्रामस्थांनी व्यसनमुक्त गावाचा निर्धार केला. याबाबत चळवळ सुरू करण्यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे.नर्मदानगर येथील सामाजिक कार्यकर्ते दरबारसिंग पाडवी हे व्यसनमुक्तीचा उपक्रम घेत आहे. यात शेकडो व्यसनाधीन वयस्क स्त्री-पुरुष व युवक सहभागी होत आहे. वर्षानुवर्षे व्यसनाधितेत जोखळलेल्या असंख्य आदिवासी कुटुंबाचे या उपक्रमांमुळे परिवर्तन झाले असून व्यसनमुक्त व सुखी संसार सुरू आहे. पूर्वजांच्या मान्यतेनुसार विविध रोगावर उपायकारक असलेली मोहाची दारू ही कालपरत्वे रासायनिक युक्त झाल्याने मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरत आहे. केमिकलयुक्त दारूच्या आहारी गेलेल्या असंख्य तरुणांमुळे गावात अशांतता पसरत वाद विवादाच्या घटनेत भर पडली आहे. तर नशेत वाहन चालवल्याने अपघाताचे प्रमाणातही वाढ झाली आहे. शिवाय संपूर्ण पिढीच बेकारीच्या खाईत अप्रत्यक्षपणे ढकलली जात असुन ही बाब समाजासाठी चिंतेची बनली आहे.व्यसनाच्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी नर्मदानगर येथील ग्रामस्थानी बैठक घेत व्यसनमुक्त गावाचा संकल्प केला. यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली असून व्यसनमुक्तीसाठी पुढे उपक्रम राबविण्यात येणार आहे. बैठकीत समिती प्रमुख दरबारसिंग पाडवी, सरपंच पुन्या वसावे, माजी सरपंच दिलीप पाडवी, पोलीस पाटील जयराम पाडवी, टेडग्या पाडवी, किरता वसावे, रोता पाडवी, सुरेश चौधरी, उमेश पाडवी, राजू पाडवी, देवानंद पाडवी, लालसिंग पावरा, दोरुसिंग वसावे, वजा पाडवी, सिंगा वसावे आदी उपस्थित होते.दारूच्या आहारी गेलेल्यांच्या कुटुंबाची अवस्था दयनीय झाली असून एका व्यसनाधीन व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर येत आहे. शेती असूनही उपजीविकेसाठी पाल्यासह स्थलांतर करीत आहे.स्थलांतराने कुटुंबाचे पालनपोषण होत असले तरी कुटुंबियांना सामाजिक, आर्थिकसह बेरोजगारी, आरोग्य, पाल्याचे शिक्षण अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते.शिवाय संपूर्ण पिढीच बेकारीच्या खाईत अप्रत्यक्षपणे ढकलली जात असुन ही बाब समाजासाठी चिंतेची बनली आहे.व्यसनामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत असतांना पोलीस प्रशासन मात्र बघ्यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर अवैध धंदे वाढीला काही अंशी पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचेही म्हटले जात आहे.