शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शहादा पालिका सभेत सौर उर्जेवरील स्नानगृहाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील सर्व नागरीकांचा सामुहिक विमा काढणे, दलित व आदिवासी वस्तीत सौर ऊर्जेवर कार्यरत स्नानगृह, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील सर्व नागरीकांचा सामुहिक विमा काढणे, दलित व आदिवासी वस्तीत सौर ऊर्जेवर कार्यरत स्नानगृह, महानुभाव पंथीय दफनभूमी, सोलर स्ट्रिट लाईटसह विविध विकास कामांना येथील पालिकेच्या गुरूवारी झालेल्या सर्व साधारण सभेत मंजुरी देण्यात आली.पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेने बांधलेल्या नूतन टाऊन हॉलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून घेण्यात आली. या वेळी उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, गटनेते प्रा.मकरंद पाटील, विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी वीरमरण आलेले जवान, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सभेला विषयपत्रिकेवरील विषय क्रमांक ३२ शहरातील ई-पोल नसलेल्या विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार सोलार एलईडी स्ट्रीट लाईट बसविणे हा विषय रद्द करून इतर सर्व विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. गटनेते प्रा.मकरंद पाटील यांनी सभेपुढे आलेल्या विषयांनाच मंजुरी देण्यात यावी जे विषय पटलावर आले नाही त्यांना मंजुरी देऊ नये. त्याच बरोबर कोणत्याही गोष्टीची निविदा काढताना भविष्याचा विचार करूनच काढावी, जेणेकरून त्यात वाढ करावी लागणार नाही असे सांगितले. नगरसेवक नाना निकुंबे यांनी विपश्यना केंद्र मंजूर झाल्याने सर्वांचे आभार मानले.नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी शहरात वास्तव्यास असलेल्या महानुभावपंथीय नागरिकांना दफनभूमीसाठी जागा देण्याची मागणी केली. या वेळी नगरसेवक संदीप पाटील, सभापती लक्ष्मण बढे, वसीम तेली, विद्या जमदाडे, इक्बाल शेख आदींसह विविध नगरसेवक, सभापतींनी चर्चेत सहभाग नोंदविला. याप्रसंगी नितीन सुरेश नाईक यांना नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र देण्यात आले.शहरात कोरोनाची साथ पसरू नये यासाठी पालिका विविध स्तरावर उपाययोजना राबवत आहे. तसेच शहरात रूग्णांची साखळी तोडण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी विविध स्तरावरून परिश्रम घेत आहेत. यासाठी नगरसेवकांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.