घमन महाराज भजनी मंडळातर्फे समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:48+5:302021-02-10T04:31:48+5:30

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून ग्रामीण भागही सुटला नाही, अशा परिस्थितीत घमन महाराज भजनी मंडळ शासनाच्या सर्व ...

Social awareness by Ghaman Maharaj Bhajani Mandal | घमन महाराज भजनी मंडळातर्फे समाजप्रबोधन

घमन महाराज भजनी मंडळातर्फे समाजप्रबोधन

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून ग्रामीण भागही सुटला नाही, अशा परिस्थितीत घमन महाराज भजनी मंडळ शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून व तोंडावर मास्क लावून कोरोनाबाबत जनजागृती करीत आहेत. या आजारापासून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे कसे संरक्षण करावे, याबाबत गावकऱ्यांमध्ये प्रबोधन करीत आहेत. गेल्या मार्च महिन्यापासून सातत्याने या महामारीवर मात करण्यासाठी भजनी मंडळ खारीचा वाटा उचलत आहे. त्यात हार्मोनियम वादक नाना वर्णा राजपूत, तबलावादक सुदाम भिका धनगर, विणा वादक सुभाष बाबूलाल राजपूत आणि गायक नाना आनंदसिंग राजपूत, जयसिंग चंद्रसिंग गिरासे, विठोबा भिका धनगर, लोटन बाजना गिरासे, संतोष दंगल धनगर, ज्ञानेश्वर रामदास धनगर, देवीदास नाथा धनगर, ज्ञानेश्वर चैत्राम धनगर, संजू नानाभाऊ धनगर, कृष्णा भिका धनगर, आधारसिंग खुमानसिंग राजपूत, रघुनाथ रुपला चित्ते आदी सदस्य भजनी मंडळाच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करीत आहेत.

Web Title: Social awareness by Ghaman Maharaj Bhajani Mandal