अन् बेसहारा वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:54 IST2020-10-11T12:54:10+5:302020-10-11T12:54:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : असहाय आणि बेघर असलेल्यांच्या जिवनात नेहमीच अंधार असतो. उदासवाने जीवन जगणाऱ्यांना नंदुरबार पालिकेने आधार ...

अन् बेसहारा वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू फुलले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : असहाय आणि बेघर असलेल्यांच्या जिवनात नेहमीच अंधार असतो. उदासवाने जीवन जगणाऱ्यांना नंदुरबार पालिकेने आधार दिला आहे. अशा या असहाय वृध्दांचा जीवनात क्षणभर आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून उपक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या हस्ते केक कापणे, मिठाई देणे, त्यांचा हृदयसत्कार करणे आणि भेटवस्तू देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बेसहारा वृद्धांनी दिलेला आशिर्वादाने उपस्थितही भारावले.
जागतिक बेघर दिनानिमित्त नंदुरबार पालिकेतर्फे सुरू असलेल बेघर निवारामध्ये जागतिक बेघर दिनानिमित्त साहित्य वाटप करण्यात आले. याशिवाय सप्ताहाचा शुभारंभ देखील करण्यात आला.
कुठलाही निवारा व आधार नसलेल्या बेघर लोकांसाठी हक्काचा सहारा मिळावा यासाठी तीन वर्र्षाींपूर्वी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतुन नगर परिषदेच्या शाळा क्र.१ येथे निवार उभारण्यात आला. याच निवाºयात १० आॅक्टोबर जागतिक बेघर दिवस साजरा करण्यात आला. या अनुषंगाने संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पालिकेचे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वसावे, महिला व बालकल्याण समिती सभापती कल्याणी मराठे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, माजी अभियंता जी.बी.लोखंडे, प्रितम ढिंढोरे, जयहिंद फाऊंडेशनचे दिग्विजय गिरासे,बार्टीच्या मिनाक्षी दांडवेकर, सारिका बेलकर, सुवर्ण जयंती अभियानाच्या मानसी मराठे उपस्थित होते.
सप्ताहात निवारा स्वच्छता, निवारा निर्जंतुुकीकरण, निवारा लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, नविन घरवासीयांसाठी शोध मोहिम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बेघर व अनाथांसाठी कायमस्वरूपी निवारा उभारण्याकरीता नगर परिषदेव्दारा जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून लवकरच प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी निवारा वासीयांसोबत केक कापून साजरा करण्यात आला. त्यांना दात्यांव्दारे देण्यात आलेल्या वस्तु त्यात ब्लॅकेट, मच्छरदानी वाटप करण्यात आली.
अभियंता लोखंडे यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला. अॅड. शुभांगी चौधरी व अॅड. रश्मी महाले यांच्याकडून मिठाई वाटप करण्यात आली. सूत्रसंचलन मानसी मराठे यांनी केले. कार्यक्रमासाठी निवारा व्यवस्थापक जितेश शर्मा, काळजीवाहक सायराबी काकर यांनी परिश्रम घेतले.
पालिकेतर्फे अद्ययावत इमारत
साकारणार...
बेघर, असाह्य लोकांना निवारा मिळावा यासाठी पलिकेने आता नवीन अद्ययावत इमारत उभी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आराखडा तयार करून शासनानकडे मदतीची मागणी करण्यात येणार आहे. सध्या या निवारागृहाचा खर्च पालिका कुठलाही फंड न येता करीत आहे. काही दाते देखील मदत करीत आहेत. आणखी काही जणांना येथे सामावणार आहेत.