शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

सहा गावांचा सुंदर गाव पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसहभागातून गावाचा कायापालट होऊ शकतो हे जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींनी दाखवून दिले असल्याचे जि.प.अध्यक्षा सिमा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकसहभागातून गावाचा कायापालट होऊ शकतो हे जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींनी दाखवून दिले असल्याचे जि.प.अध्यक्षा सिमा वळवी यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते विसरवाडीसह सहा ग्रामपंचायतींना सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर.(आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते स्व. आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार २०१९-२०२०चे वितरण करण्यात आले. विसरवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री पाटील, महिला व बालविकास सभापती निर्मला राऊत, कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजीत पाटील, पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, बायजाबाई भील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते.लोकसहभागातून चांगली कामे केल्यास सुंदर गावे निर्माण करता येतील. गावात स्वच्छता अभियान राबवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करावा, असे सिमा वळवी यांनी यावेळी सांगितले.गावडे म्हणाले, पारितोषिक विजेत्या गावांचा आदर्श घेऊन इतरही गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील अधिकाधिक गावे सुंदर करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत. रौंदळ यांनी प्रास्ताविकात पुरस्कार योजनेविषयी माहिती दिली. स्व. आर.आर. पाटील यांनी ग्रामविकासासाठी बहुमूल्य योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत कोळदा ता.नंदुरबार, विसरवाडी, ता.नवापूर, लोणखेडा, ता.शहादा, रोझवे, ता. तळोदा, भाबलपूर, ता.अक्कलकुवा आणि खडक्या, ता. धडगाव या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी विसरवाडी सरपंच बकाराम गावित यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन डॅा.राहुल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.