नवापूर तालुक्यात वेगवेगळ्या दोन अपघातात सहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 01:07 PM2020-11-29T13:07:53+5:302020-11-29T13:08:00+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी/नवापूर :  विसरवाडी- नवापूर तालुक्यातील भांगरपाडा ते तारपाडा रस्त्या दरम्यान भरधाव वेगात जाणाऱ्या दोन मोटर सायकल ...

Six persons were injured in two separate accidents in Navapur taluka | नवापूर तालुक्यात वेगवेगळ्या दोन अपघातात सहाजण जखमी

नवापूर तालुक्यात वेगवेगळ्या दोन अपघातात सहाजण जखमी

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी/नवापूर :  विसरवाडी- नवापूर तालुक्यातील भांगरपाडा ते तारपाडा रस्त्या दरम्यान भरधाव वेगात जाणाऱ्या दोन मोटर सायकल यांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला.
 तालुक्यातील भांगारपाडा ते तारपाडा दरम्यान गुरुदास कृष्णा वसावे (२२) व रितेश बापू गावित (२०) दोघेही राहणार तारपाडा, हे त्यांची मोटरसायकल (क्रमांक एम एच ३९-  ८७४४) ने विसरवाडी कडे येत  होते. याच वेळी लालसिंग सिंगा वसावे छगन यशु वळवी  (२८), व तानाजी गोरजी वसावे (३२) तिघे राहणार बंधारे हे त्यांच्या नव्याने घेतलेली मोटर सायकलने तारपाडा कडे भरधाव वेगाने जात असताना दोन्ही मोटर सायकल समोरासमोर धडकल्या. या अपघातात हे पाच जण जखमी झाले. त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात  रुग्णवाहिका ने तात्काळ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी व डॉ. वटसिंग पावरा व परिचारिका यांनी प्राथमिक उपचार केले. पैकी गुरुदास कृष्णा वसावे व लालसिंग सिंगा वसावे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना त्वरित नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर तानाजी गोरजी वसावे यास किरकोळ दुखापत झाल्याने तो रुग्णालयात आलाच नाही.
 विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड तात्काळ रुग्णालयात दाखल झाले त्यांनी जखमींची विचारपूस केली.
तर दुसरीकडे धुळे-सुरत महामार्गावरील चिंचपाड्यात मोटरसायकलीचा अपघात झाला यात दोन युवक जखमी झाले त्यांना उपचारार्थ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात कपिल मी-या गावित (१८) राहणार बर्डीपाडा विष्णू प्रतापसिंह गावित (२०) रा. तिळासर हे दोन्ही युवक जखमी झाले आहे. त्यांना जबर दुखापती झाल्या असून ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
नवापूर तालुक्यांमध्ये भरधाव वेगाने मोटरसायकल चालवणे, स्पर्धा लावणे या घटना वाढू लागल्याने अपघात होऊन तरूण मंडळी जखमी होत आहे.

Web Title: Six persons were injured in two separate accidents in Navapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.