शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

निरीक्षक ॲपवर माहिती न भरणाऱ्या मुख्याध्यापकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:32 AM

आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयाने शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहातील दैनंदिन कामकाजाच्या नियंत्रणासाठी व क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या भेटीच्या नोंदीसाठी ...

आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयाने शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहातील दैनंदिन कामकाजाच्या नियंत्रणासाठी व क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या भेटीच्या नोंदीसाठी निरीक्षण ॲप विकसित केले आहे. या ॲपवर अधिकाऱ्यांच्या भेटींसह शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीचे फोटो अपलोड करावेत, असे प्रकल्प कार्यालयाकडून सूचित करण्यात आलेले आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सुरुवातीला या ॲपचा प्रभावी वापर करता येऊ शकला नाही. मात्र अनलॉक लर्निंगमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर या ॲपमध्ये माहिती भरण्याच्या सूचना प्रकल्प कार्यालयाकडून वेळोवेळी शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या होत्या.

नुकत्याच झालेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा मुख्याध्यापकांच्या संयुक्त मासिक सभेतही सर्व मुख्याध्यापकांना प्रकल्प कार्यालयाने विकसित केलेल्या निरीक्षण ॲपचा वापर रोज मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी उपस्थितीचे फोटो अपलोड करण्याबाबत तसेच आपल्या शाळेतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग विद्यार्थी उपस्थिती नियमित पाठविणे, व्हाॅट्सॲप ग्रुपवर टाकणे, इत्यादींबाबतच्या सूचना साहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. तरीदेखील मुख्याध्यापकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याने प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांनी ३७ शासकीय, तर २१ अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबत ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत.

सर्व मुख्याध्यापकांना मासिक सभेत निरीक्षणाबाबत सूचना देऊनही अद्यापपर्यंत कोणीही निरीक्षण व मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे फोटो अपलोड किंवा माहिती भरलेली नाही. याचा अर्थ असा की, आपण आपल्या कामात हलगर्जीपणा करीत आहोत किंवा हेतुपुरस्सर निरीक्षणावर माहिती भरण्यास टाळाटाळ करतो आहोत, असा आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या सूचनांचा अवमान केला जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असल्याचे प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांनी या कारणे दाखवा नोटिसीमध्ये नमूद केले आहे. तेव्हा आपल्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील नियम वर्तणूकनुसार कारवाई का करण्यात येऊ नये? असा प्रश्न विचारला आहे. याबाबतचा तीन दिवसांच्या आत खुलासा सादर करावा. विहित मुदतीत समर्पक खुलासा प्राप्त न झाल्यास आपले काहीएक म्हणणे नाही, असे गृहीत धरून ही कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही नोटिसीत म्हटले आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांचे धाबे दणाणले आहे. मुख्याध्यापकांनी नोटिसीचा खुलासा सादर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काहींचे खुलासे प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झाले असून, त्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे माहिती भरता येता आली नसल्याचे कारण नमूद केले असल्याचे सांगितले जाते. यानंतर प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे