चप्पल काढण्याच्या वादातून शहाद्यात जमावाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:01 IST2018-03-31T12:01:44+5:302018-03-31T12:01:44+5:30

Shot of people in Shahadan fight | चप्पल काढण्याच्या वादातून शहाद्यात जमावाची मारहाण

चप्पल काढण्याच्या वादातून शहाद्यात जमावाची मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किराणा दुकानाच्या बाहेर चप्पल काढण्याचे सांगितल्याचा राग येवून जमावाने तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना शहादा येथील नागसेननगर भागात घडली. याबाबत आठ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागसेननगरात किराणा दुकानाच्या बाहेर अलमास सत्तार बेलदार यास राहुल दगा पिंपळे यांनी चप्पल बाहेर काढण्यास सांगितले. त्याचा राग येवून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. राहुल पिंपळे यास अलमास सत्तार बेलदार यांच्यासह दानिश सलीम शेख, बिल्लू बेलदार मिस्तरी, शहारूख शहा मिस्तरी, अल्ताफ बागवान, समीर अकिल मिङरा सर्व रा.तकिया बाजार, जुबेर सादीक शेख,  भरू सादिक शेख सर्व रा.गरीब नवाज कॉलनी यांनी लोखंडी फायटर, लाठय़ा-काठय़ा व दगडाने बेदम मारहाण केली. त्यात राहुल दगा पिंपळे याच्यासह भांडण सोडविण्यास आलेले बादल अजरून पवार, धनराज दादाभाई ईशी हे देखील गंभीर जखमी झाले.
राहुल पिंपळे याने दिलेल्या फिर्यादीवरून जमावाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shot of people in Shahadan fight