शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST

घरातील एक व्यक्ती जरी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला तरी घरातील इतर सदस्यांना कोरोनाची बाधा होत आहे. कितीतरी नागरिक कोरोनाचा ...

घरातील एक व्यक्ती जरी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला तरी घरातील इतर सदस्यांना कोरोनाची बाधा होत आहे. कितीतरी नागरिक कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर घरात किंवा इतरांना कल्पना न देता आजाराची लक्षणे असूनही दुखणे अंगावर काढत आहेत. सध्या बेड उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करावे लागत आहे. त्याठिकाणी रुग्णांसाठी इंजेक्शन उपलब्ध होत नाही. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा मिशन हॉस्पिटलमध्ये तब्बल १५ रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असताना कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांची भटकंती सुरू आहे. परंतु इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत. हे इंजेक्शन विकताना अवाजवी पैसे घेऊ नये, इंजेक्शनच्या मूळ किमतीइतकीच रक्कम ग्राहकांकडून घ्यावी, असे नियम असले तरी अतिरिक्त किंमत देऊन हे इंजेक्शन घ्यावे लागत आहे. कित्येक रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन आणण्यासाठी गुजरात राज्यात जावे लागत आहे. मात्र, तेथेही इंजेक्शन मिळवताना त्यांची धावपळ होत आहे. इंजेक्शनचा पुरवठा त्वरित व्हावा, रुग्णाच्या नातेवाइकांची धावपळ होऊ नये आणि रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी तालुक्यातील डॉक्टर, होलसेलर आणि औषध विक्रेत्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे मत आमदार शिरीषकुमार नाईक यांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागात अनेक व्यक्ती कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यामुळे एवढे महागडे इंजेक्शन घ्यायची त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. परिणामी दुखणे अंगावर काढल्यानंतर दुखणे बळावते व त्यातच रुग्णाचा मृत्यू होतो. यासाठी सरकारने तातडीने ग्रामीण भागात हे इंजेक्शन वाजवी किमतीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.