शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सवलत असताना दुकाने मात्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जिल्ह्यात प्रशासनाने खबरदारी घेत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमधून काही बाबींना शिथिलता तर काही बाबी बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जिल्ह्यात प्रशासनाने खबरदारी घेत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमधून काही बाबींना शिथिलता तर काही बाबी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी दुकान उघडे करण्याचे आदेश असले तरी शहरातील मोठ्या संख्येने दुकानदारांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णय घेतल्याने शहरातील विविध भागांमधील दुकाने बंद असल्याचे दिसून आले.शहादा शहरात कोरोनाचे नऊ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण शहरात आहेत. शहरात रूग्ण आढळलेल्या भागांमध्ये प्रशासनाने प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून ते सील केले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील इतर भागांमध्ये प्रशासनाच्या वतीने नियमावली आखत व्यापाऱ्यांना ठरवून दिलेल्या वेळेत आपली दुकाने सुरू करण्याची मुभा दिली होती. मात्र अनेक भागातील व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचे पसंत केले. शहरात कोरोनाचे नऊ रुग्ण असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील नागरिक गरज नसल्याने बाहेर पडणे टाळत आहेत. शहरात रुग्णांची वाढती संख्या बघता यामुळेच व्यापाºयांनी सुरक्षेच्या कारणास्तव दुकाने बंद ठेवल्याची चर्चा सुरू होती.शहरातील मेनरोड भागात मुख्य मार्केट आहे. मात्र तो परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने मेनरोड भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच दोंडाईचा रोड, पुरुषोत्तम मार्केट, स्टेट बँक चौक, सप्तशृंगी माता मंदिर आदी भागातील दुकानेही बंद असल्याचे दिसून आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता तुरळक प्रमाणात इतर दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.