लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : येथील के.एस.मार्केटमधील मोबाईल दुकानातून चोरट्यांनी १८ हजार रुपये रोख आणि तीन हजारांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली.के.एस.मार्केटमधील मोबाईल दुकानाचे चोरट्यांनी शटर उचकवून आत प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यात ठेवण्यात आलेले १८ हजार रुपये रोख आणि तीन हजार रुपयांचा डेमोचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला. याबाबत दुकान मालक योगेश सुरेशचंद्र शर्मा यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक विनोद नाईक करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}