रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने शहादा तालुक्यात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:21 PM2019-11-19T12:21:48+5:302019-11-19T12:22:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह ग्रामीण भागात रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने ग्रामीण भागात प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर ...

Shocked in Shahada taluka due to closure of supply of kerosene | रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने शहादा तालुक्यात नाराजी

रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने शहादा तालुक्यात नाराजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरासह ग्रामीण भागात रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने ग्रामीण भागात प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रॉकेलचा पुरवठा सुरू असताना केवळ शहादा तालुक्यातील रॉकेल पुरवठा बंद करून सावत्रपणाची वागणूक दिली असून या प्रकरणाची चौकशी करून शहादा तालुक्याला त्वरित रॉकेलचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी असून नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा ,धडगाव या तालुक्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात रॉकेलचा पुरवठा केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र शहादा तालुक्यासाठी जो पुरवठा तक्ता आहे त्याच्यामध्ये निरंक पुरवठा दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहाद्याचे तत्कालीन तहसीदारांनी जिल्हाधिका:यांना दिलेल्या लेखी अहवालात शहादा शहराला व ग्रामीण भागाला रॉकेलची आवश्यकता नाही,  असे म्हटले आहे. अर्थात त्या अधिका:यांनी कोणत्या आधारावर तो अहवाल पाठवला याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. वास्तविक पुरवठा विभागाने शहादा शहर व संपूर्ण तालुक्यातील रॉकेल परवानाधारकांना किती रॉकेल लागते, रॉकेलची आवश्यकता नाही का याची चौकशी करणे गरजेचे होते. शासनाने रॉकेलच्या पुरवठय़ात कपात केली आहे, प्रत्येक परवानाधारकांना पुरवठा कमी करण्यात आलेला आहे त्याबद्दल दुमत नाही. ती प्रशासनाची कायदेशीर बाब आहे. मात्र जिल्ह्यात सर्व तालुक्यांना रॉकेलचा पुरवठा होत असताना केवळ शहादा तालुक्याला रॉकेल पुरवठा न करता सावत्रपणाची वागणूक देण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
एका बाजूला केंद्र शासनाने उज्वला योजनेमार्फत ग्रामीण भागात गॅस पुरवठा करण्यात आला पण आजच्या परिस्थितीमध्ये चौकशी केली असता शहादा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये 100 टक्के उज्वला गॅस योजनेचे गॅस वाटप करण्यात आलेले नाही. असे असताना रॉकेल पुरवठा बंद करण्यात आला. ज्यांच्याकडे अद्याप गॅस नाही त्यांनी काय करावे. श्रमिक, शेतमजूर आदिवासींना रॉकेल जीवनावश्यक बाब आहे. त्यांना रॉकेल मिळत नसल्याने त्यांची भटकंती सुरू आहे. 

Web Title: Shocked in Shahada taluka due to closure of supply of kerosene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.