शहादा तालुक्यात शॉक लागून युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 26, 2017 18:28 IST2017-06-26T18:14:38+5:302017-06-26T18:28:38+5:30

शहादा तालुका : मयत नववीचा विद्यार्थी

Shocked in Shahada taluka, the death of a young man | शहादा तालुक्यात शॉक लागून युवकाचा मृत्यू

शहादा तालुक्यात शॉक लागून युवकाचा मृत्यू

>ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.26 : शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील 15 वर्षीय मुलाचा होळ गुजरी शिवारातील शेतात विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े 
डोंगरगाव येथील दिवेश रणजितसिंग गिरासे हा 15 वर्षीय मुलगा रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास होळ गुजरी ता़ शहादा शिवारातील शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेला होता़ याठिकाणी मोटार सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला विजेचा जोरदार शॉक लागून तो जागीच मयत झाला़ 

Web Title: Shocked in Shahada taluka, the death of a young man