शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा सस्पेन्समुळे उत्सूकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन्यासाठीची गोपनियता तिन्ही पक्षांनी कायम ठेवली आहे. काँग्रेसचे सदस्य राज्याबाहेर तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन्यासाठीची गोपनियता तिन्ही पक्षांनी कायम ठेवली आहे. काँग्रेसचे सदस्य राज्याबाहेर तर भाजपचे सदस्य जिल्ह्यालगत एका शहरात एकत्र आहेत. शिवसेनेचे सदस्य सहलीवरून परतले आहेत. काँग्रेस-शिवसेना एकत्र येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे भाजपनेही आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत प्रचंड उत्सूकता लागून आहे.जिल्हा परिषदेत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पाठींब्यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. ही बाब लक्षात घेता प्रत्येकी २३ सदस्य असलेल्या भाजप व काँग्रेसने सावध खेळी खेळल्या आहेत. भाजपने राष्टÑवादीच्या तीन सदस्यांसोबत गट स्थापन केला आहे. गटनेते म्हणून कुमुदिनी गावीत यांची निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सद्य स्थितीत २६ सदस्य आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडे २३ सदस्य आहेत. शिवसेनेने पाठींबा दिला तर त्यांची संख्या ३० होणार आहे. बहुमतासाठी २९ सदस्य आवश्यक आहेत.गेल्या आठ दिवसांपासून वेगवान राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. काँग्रेसने आपले सदस्य राज्याबाहेरील एका शहरात तर भाजपने आपले सदस्य जिल्ह्यालगतच्या एका शहरात सहलीसाठी नेले आहेत. शिवसेनेचेही सदस्य बाहेरगावी गेले होते मात्र ते परत आले आहेत.काँग्रेस व भाजपने बहुमत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आपलीच सत्ता स्थापन होईल असा विश्वास दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे.परंतु ऐनवेळी काहीही घडामोडी घडू शकतात. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. आगामी राजकारणाची दिशा देखील त्यावरच अवलंबून राहणार असल्यामुळे ऐनवेळी राजकीय घडामोडी वळण घेवू शकतात असेही बोलले जात आहे.

बुधवारी नवापूर येथे काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाल्याचा दावा एका नेत्याने केला आहे. त्यात सत्ता स्थापनेचा फार्म्यूला ठरला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस-शिवसेना एकत्र येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. याला एका नेत्याने देखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आणि नंदुरबार पालिकेतील सत्तेचा फार्म्यूला जिल्हा परिषदेतही कायम राहणार का? याकडे लक्ष लागून आहे.