अवकाळी पावसामुळे नुकसानाचा पंचनामा करण्याची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:37+5:302021-01-10T04:24:37+5:30
नंदुरबार: अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे ...

अवकाळी पावसामुळे नुकसानाचा पंचनामा करण्याची शिवसेनेची मागणी
नंदुरबार: अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे व व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, भरपाई मिळावी, यासाठी जलद गतीत पंचनामे करावे व मदत मिळवून द्यावी, या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांना शिवसेनेच्यावतीनेे देण्यात आलेे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे तालुकाप्रमुख व्यंकट पाटील, उपतालुका प्रमुख सागर साळुंके, तालुका संघटक जगदीश पाटील, ब्रिजलाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रफुल खैरनार, उत्तम पाटील, निखिल पाटील, अंबालाल राजपूत उपस्थित होते.
करण चौपुलीजवळील रस्ता उखडल्याने अपघाताची शक्यता
नंदुरबार: शहरातील करण चौपुली येथे सतत जड वाहनांमुळे रस्ता उखडला असून, मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो आहे. संबंधितानी समस्येची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
ग्रामीण भागातील तरुणांचा पोलीस भरती सराव सुरूच
नंदुरबार: तालुक्यातील शनिमंडळ गावासह इतर गावातील तरुण सायंकाळी पोलीस भरतीचा सराव करीत आहेत. मैदानी सराव करण्यासाठी ग्रामीण भाागातील तरुण रस्त्याने धावत आहेत. मैदानावरील सरावात गोळाफेक, १६०० व १०० मीटर धावणे, पुशअप, पुलअप्स, लांब उडी, तरुण दररोज तयारी करत आहेत. मैदानी चाचणी तयारीसह लेखी परीक्षांचा अभ्यास व बहूपर्यायी प्रश्नसंच या अभ्यासातील गोष्टीचा सराव करत आहे.