शहाद्यातील निवृत्त सैनिकाच्या घरात भर दिवसा चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:03 IST2018-03-01T12:03:15+5:302018-03-01T12:03:15+5:30

 Shahid's retired soldier tried to steal the day in the house | शहाद्यातील निवृत्त सैनिकाच्या घरात भर दिवसा चोरीचा प्रयत्न

शहाद्यातील निवृत्त सैनिकाच्या घरात भर दिवसा चोरीचा प्रयत्न


लोकमत ऑनलाईन
शहादा, दि़ 1 : हरिओम नगरातील निवृत्त सैनिकाच्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरटय़ांनी भरदिवसा चोरीचा धाडसी प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील मुबारकपूर येथील रहिवाशी तथा निवृत्त सैनिक शरद भगतसिंग अहेर हे दोंडाईचा रस्त्यावरील हरिओम नगरात राहतात. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी मुलांना क्लासेसला सोडण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. या काळातच अज्ञात चोरटय़ांनी भर दिवसा घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील तीन लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला. मात्र चोरटय़ांना किंमती ऐवज वा मोठी रक्कम हाती लागू शकली नाही. थोडय़ावेळाने घरी परत आलेल्या शरद अहेर यांच्या पत्नीस घराचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. त्यांनी शेजारी व नातेवाईकांना ही माहिती दिली.
भर दिवसा अज्ञात चोरटय़ांनी घरफोडी केल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.चोरटय़ांचा शोध लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Shahid's retired soldier tried to steal the day in the house