शहादा येथील स्टेट बँकेची फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:51 IST2018-12-09T12:51:02+5:302018-12-09T12:51:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्टेट बँकेतून पावणेचार लाख रुपये मालमत्ता तारण न करता कर्ज घेतले. त्यानंतर तीच मालमत्ता ...

शहादा येथील स्टेट बँकेची फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्टेट बँकेतून पावणेचार लाख रुपये मालमत्ता तारण न करता कर्ज घेतले. त्यानंतर तीच मालमत्ता परस्पर विकून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी शहादा येथील एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील गरीब नवाज कॉलनी भागात राहणारे हलीम शेख कादत शेख कुरेशी यांनी ऑगस्ट 2007 ते जानेवारी 2012 या दरम्यान स्टेट बँकेकडून तीन लाख 75 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यासाठी लागणारी मालमत्ता त्यांनी तारण करून देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर 2012 ते डिसेंबर 2018 या दरम्यान मलोणी शिवारातील तीच मालमत्ता कुरेशी यांनी परस्पर विकून दिली. यामुळे बँकेची तीन लाख 75 हजार रुपयांची फसवणूक झाली.
याबाबत बँक मॅनेजर विनय दामोदर सोनवणे यांनी चौकशी करून हलीम शेख कादत शेख कुरेशी यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून कुरेशी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार पवार करीत आहे.