शहादानजीक 71 लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 16:41 IST2017-12-29T16:41:40+5:302017-12-29T16:41:46+5:30

Shahadabadi seized a gutka of 71 lakhs | शहादानजीक 71 लाखांचा गुटखा जप्त

शहादानजीक 71 लाखांचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील अनरद बारी येथे शुक्रवारी पहाटे एका ट्रकमधून 71 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आह़े हा ट्रक (क्रमांक आऱज़े 27 जी़एल़ 0819) राजस्थान येथून कर्नाटककडे जात होता़ पोलिसांनी संशयावरून ट्रकची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला.
31 डिसेंबर जवळ येत असल्याने पोलीस प्रशासनाकडून सिमावर्ती भागात तसेच मुख्य मार्गावरुन संशयितरित्या जाणा:या  वाहनांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आह़े गस्त घालत असताना, अनरद बारीजवळ संशयितरित्या एक ट्रक आढळला चालकांला विचारले असता, हा ट्रक राजस्थान येथील राजसमंदर येथून कर्नाटकातील बिथर येथे जात असल्याचे त्याने सांगितल़े त्याच प्रमाणे यात ब्रँडेड गुटखा असल्याची माहिती त्याने दिली़ महाराष्ट्रात गुटखाबंदी  असताना हा ट्रक राज्याच्या हद्दीतून जात असल्याने पोलीसांनी ही कारवाई केली़ दरम्यान या गुटख्यावर कुठल्याही प्रकारचे ब्रँडनेम नव्हते एका खाकी कलरच्या 950  खोक्यात ही तंबाखू ठेवण्यात आली होती़ हा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाकडे देण्यात आला आह़े
ट्रकचालक पर्वतसिंग मोजावत  (45) याला ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार, पोलीस उपनिरीक्षक युवराज सैदाणे, हवालदार दत्ता बागल, चंद्रकांत देसले, जितेंद्र सूर्यवंशी आदींनी ही कारवाई केली़ पुढील तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे एल़ए़  दराडे, सहाय्यक अन्न सुरक्षा अधिकारी डी़डी़ तांबोळी, जी़व्ही़ कासार, मंगेश भावसार आदींनी साठा ताब्यात घेत तपास सुरु केला आहे.

Web Title: Shahadabadi seized a gutka of 71 lakhs