शहाद्यात तीन ठिकाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:44 IST2018-11-16T12:44:40+5:302018-11-16T12:44:44+5:30
शहाद्यात खळबळ : नऊ लाखांचा ऐवज चोरीस, तपासासाठी पथक स्थापन

शहाद्यात तीन ठिकाणी चोरी
शहादा : शहाद्यात एकाच रात्री सात ठिकाणी घरफोडी करून चोरटय़ांनी जवळपास नऊ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले.
दिवाळीनिमित्त अनेक कुटूंब बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे घरे बंद आहेत. ही संधी साधत चोरटय़ांनी एकाच रात्री सात घरांमध्ये हातसफाईचा प्रय} केला. पैकी चार ठिकाणी त्यांना यश आले. तीन ठिकाणी चोरटय़ांना यश आले नाही. शहरातील शिवसुंदरम कॉलनीतील मायाबाई भरत पाटील या सुट्टीनिमित्त कुटूंबासह बाहेरगावी सहलीसाठी गेल्या आहेत. बंद घराचे बाहेरील कुलूप तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त केला. त्यात लहान मुलीच्या गल्ला आढळून आल्याने त्यातील दहा हजार रुपये त्यांनी लंपास केले. नंतर देवघराला टारगेट करत देवघरात जाऊन देवघराची झडती घेतली त्यात 21 तोळे सोन्याचे दागीने त्यांच्या हाती लागले. सकाळी याच घरासमोरील मानक चौधरी हे बाहेर निघाले असता त्यांना कुलूप पडलेले दिसले त्यांनी नातेवाईकांना फोन करून पोलिसांना पाचारण केले त्यानंतर चोरी उघड झाली. त्यांच्या घरामागील बाजूस शिवा पाटील यांचे गोडाऊन आहे. ते देखील फोडण्याचा प्रय} करण्यात आला, पण हाती काहीच लागले नाही. चोरटय़ांनी त्यानंतर डोंगरगाव रस्त्यावरील तुळशीनगर या भागाकडे मोर्चा वळविला. तुळशीनगर मधील 29 ब या प्लॉटमधील घरात भाडेकरू म्हणून राहत असलेले प्राथमिक शिक्षक विशाल गुलाबसिंग सिसोदे यांच्या घरातही चोरी केली. चोरट्यांनी तेथील देवघर टारगेट केले. तेथून सहा तोळे सोने व पाच हजार रुपये रोख चोरून नेले. त्याच घरासमोर बंद असलेले राजेंद्र गोपीचंद वाघ यांचे घर देखीेल फोडण्याचा प्रयत्न केला. आठ महिन्यापूर्वी राम अशोक सोनार यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली होती तेथेदेखील चोरी करण्याचा अयशस्वी प्रय} केला. चंद्रकांत पाटील व अतूल कुलकर्णी यांचे घरही फोडण्याचा प्रयत्न झाला.
पोलिसांनी सर्व ठिकाणचा पंचनामा करून नंदुरबार येथून ठसेतज्ञ योगेंद्र राजपूत, चेतन चौधरी, दीपक गोरे यांनी येवून ठसे घेतले. श्वान पथक देखील मागविण्यात आले होते. तपास फौजदार दिपक बागुल, पोलीस नाईक देवराम गावीत, सुनील वाकडे, मनोज चौधरी करत आहे.