शहादा येथून अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:30 IST2018-03-12T11:30:01+5:302018-03-12T11:30:01+5:30

Shahada has filed an offense in the custody of a minor girl | शहादा येथून अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शहादा येथून अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 12 : आडगाव ता़ शहादा येथील अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शुक्रवारी दुपारी दोन वाजेपासून युवतीस पळवून नेण्यात आल्याची माहिती आह़े 
आडगाव येथील 17 वर्षीय 7 महिने वय असलेली युवती विकास हायस्कूलमध्ये नेहमीप्रमाणे आली असता, जालिंदर हरी पवार रा़ रायखेड ता़ शहादा याने तिला पळवून नेल़े युवतीच्या वडिलांनी संशयिताच्या घरी जाऊन मुलीला परत पाठवण्याबाबत विनवण्या केल्या होत्या़ संशयिताने युवतीच्या वडिलांची यावेळी दिशाभूल केली होती़ याप्रकरणी अल्पवयीन युवतीच्या वडिलांनी शनिवारी शहादा पोलीस ठाण्यात जालिंदर पवार याच्याविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
 

Web Title: Shahada has filed an offense in the custody of a minor girl