शहादा येथे कारमधून सोन्याची पोत लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:16 IST2019-10-23T13:16:13+5:302019-10-23T13:16:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील श्रमिक नगरात दिवाळीची खरेदी करणा:या दाम्पत्याच्या कारमधून दीड लाख रुपयांची मंगलपोत अज्ञात ...

शहादा येथे कारमधून सोन्याची पोत लांबवली
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील श्रमिक नगरात दिवाळीची खरेदी करणा:या दाम्पत्याच्या कारमधून दीड लाख रुपयांची मंगलपोत अज्ञात व्यक्तीने लांबवली़ सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान ही घटना घडली़
शहाद्यातील साईबाबा नगरात राहणारे प्रशांत अविनाश पाटील हे पत्नीसह श्रमिक नगरात खरेदीसाठी गेले होत़े यावेळी त्यांच्या एमएच 39 जे 5720 या चारचाकी वाहनात त्यांच्या पत्नीची पर्स ठेवली होती़ पर्समध्ये 1 लाख 65 हजाराची (55 ग्रॅम) सोनपोत होती़ दरम्यान अज्ञात चोरटय़ाने कारमधील पर्समधून ती मंगलपोत चोरुन नेली़ हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशांत पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे करत आहेत़