जुनमोहिदे येथील अल्पवयीन युवतीवर पळासवाडा शिवारात लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:16 IST2019-04-09T12:16:31+5:302019-04-09T12:16:54+5:30

संशयितास अटक : तीन दिवसांची पोलीस कोठडी

Sexual harassment at Palsavada Shivar on a minor girl of Junhmihida | जुनमोहिदे येथील अल्पवयीन युवतीवर पळासवाडा शिवारात लैंगिक अत्याचार

जुनमोहिदे येथील अल्पवयीन युवतीवर पळासवाडा शिवारात लैंगिक अत्याचार

नंदुरबार : विवाहाचे अमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार पळासवाडा ता़ शहादा व जुनेमोहिदे ता़ नंदुरबार येथे घडला़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी संशयितास ताब्यात घेतले आह़े 
नांदरखेडा येथील मनेश गणेश भिल याने जुनमोहिदे ता़ नंदुरबार येथील अल्पवयीन युवतीला 2017 पासून विवाहाचे अमिष दाखवत पळासवाडा शिवार ता़ शहादा आणि जुनमोहिदे येथील घरी वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला होता़ यातून युवती गर्भवती राहिली होती़ याची माहिती मनेश यास मिळाल्यानंतर त्याने विवाह करण्यास नकार देत युवतीची फसवणूक केली़ युवतीने कुटूंबियांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली़ 
अल्पवयीन युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलीस ठाण्यात संशयित मनेश भिल याच्याविरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहादा  उपविभागीय पोलीस अधिकारी पी़टी़सपकाळे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी युवतीची भेट घेत माहिती जाणून घेतली़ रविवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ संशयित आरोनी मनेश भिल यास अटक करण्यात आली़ त्याला सोमवारी शहादा न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक  निलेश मोरे करत आहेत़ 
 

Web Title: Sexual harassment at Palsavada Shivar on a minor girl of Junhmihida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.