२४ हजार शेतकऱ्यांचा सातबारा झाला कोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:47 IST2020-10-11T12:47:45+5:302020-10-11T12:47:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात २४ हजार ७७१ शेतकऱ्यांचे आधार ...

२४ हजार शेतकऱ्यांचा सातबारा झाला कोरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात २४ हजार ७७१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून त्यातील २४ हजार ६७१ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. या शेतकºयांना त्यांच्या खात्यात १८६ कोटी ४६ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात तात्काळ आधार प्रमाणिकरणास सुरूवात करण्यात आली होती. पालकमंत्री अॅड.के.सी .पाडवी यांनी प्रत्येक पात्र शेतकºयाला योजनेचा लाभ मिळेपर्यंत कर्जमुक्तीची प्रक्रीया सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. जिल्ह्यातील महसूल यंत्रणा आणि सहकार विभागाने परस्पर समन्वयाच्या माध्यमातून आधार प्रमाणिकारणाचे चांगले नियोजन करण्यात आले. आधार प्रमाणिकरणातील अडचणी सोडविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या.
सहकार विभागामार्फत ग्रामीण भागात पाच पथके तयार करून शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करून घेण्यात आले.
या पथकांनी दुर्गम भागातील शेतकºयांपर्यंत योजनेची माहितीदेखील पोहोचवली. काही शेतकºयांच्या हंगामी स्थलांतरामुळे येणाºया अडचणीतूनही या पथकांनी मार्ग काढत अधिकाधीक शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करून घेतले.
नंदुरबार तालुक्यात ९,४१८, नवापूर तालुक्यात ३,३६४, तळोदा १,७४६, अक्कलकुवा तालुक्यात २,१७९, शहादा तालुक्यात ७,११७ आणि धडगाव तालुक्यात ९४७ अशा एकुण २४ हजार ७७१ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले. प्रमाणिकरण झालेल्या शेतकºयांच्या खात्यात लाभाची रक्कम वितरीत करण्याचे कामदेखील तात्काळ करण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यात ९,३७५ शेतकºयांच्या खात्यात ७१ कोटी ३० लाख, नवापूर तालुक्यातील ३,३५८ शेतकºयांच्या खात्यात २३ कोटी एक लाख, तळोदा १,७२२ शेतकºयांच्या खात्यात १५ कोटी ३६ लाख, अक्कलकुवा तालुक्यात २,१७१ शेतकºयांच्या खात्यात १५ कोटी आठ लाख, शहादा तालुक्यात ७,१०४ शेतकºयांच्या खात्यात ५८ कोटी आठ लाख आणि धडगाव तालुक्यातील ९४४ शेतकºयांच्या944 खात्यात तीन कोटी ६३ लक्ष असे एकूण २४ हजार ६७१ शेतकºयांच्या खात्यात १८६ कोटी ४६ लाख रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे. उर्वरीत शेतकºयांच्या खात्यातही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात केवळ ३९८ पात्र शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण राहिले असून त्यासाठी मोहिम स्तरावर सहकार विभागाच्या पथकामार्फत काम सुरू आहे.
लवकरच सर्व पात्र लाभार्थी कर्जमुक्त होऊन नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरतील, अशी माहिती सहकार उपनिबंधक अशोक चाळक यांनी दिली आहे.
- अद्यापही अनेक शेतकरी वंचीत...
- कर्जमुक्तीपासून अद्यापही अनेक शेतकरी वंचीत आहेत. विविध अटी व शर्र्तींमुळे अनेक शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही. आधार प्रमाणीकरण केलेले असतांना देखील अनेकांना फिरवाफिरव झालेली आहे. त्यामुळे पात्र सर्वच शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा व त्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे. याबाबत सहकार विभागाने गांभिर्याने घेणे आवश्यक आहे.