शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रम शाळांच्या सुसज्ज इमारतींमध्ये विलगीकरण कक्ष उभारा : कांतिलाल टाटिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST

आदिवासी भागात घरांची रचना पाहता होमक्वारंटाईन म्हणजे मोठ्या प्रमाणात कोविडचा विस्तार करणारी योजना ठरणार आहे. ज्या ठिकाणी आदिवासी विभागाच्या ...

आदिवासी भागात घरांची रचना पाहता होमक्वारंटाईन म्हणजे मोठ्या प्रमाणात कोविडचा विस्तार करणारी योजना ठरणार आहे. ज्या ठिकाणी आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा सुसज्ज इमारतीसह आहेत व तेथेच प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा आहे, अशा ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारून आसपासच्या अनेक रुग्णांची तेथे सोय होऊ शकते. आश्रमशाळेच्या असलेल्या सेटअप सुरू करून दोन वेळचा सकस आहार, तसेच फळे, रोगावरील प्राथमिक उपचार, रोगप्रतिकर शक्ती वाढवणारी औषधेदेखील व्यवस्थित देता येतील. हा सर्व खर्च आदिवासी विभागाला आपल्या विविध योजनांतून करता येणे सहज शक्य आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र लगत असल्याने विलगीकरण कक्षात वैद्यकीय देखरेख ठेवणे सुलभ जाणार आहे. म्हणून तातडीने हा निर्णय घ्यावा.

तसेच ज्या गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह सापडतील, त्या संपूर्ण गावाची तपासणी करून "रुग्ण शोध मोहीम" अधिक तीव्र करावी, जेणेकरून प्राथमिक स्वरुपातच रुग्ण सापडतील. त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाणार आहे. आदिवासी भागात सुसज्ज इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तेथे विलगीकरण कक्ष सुरु करावेत व कोविडवर मात करण्यासाठी निर्णय घेतला जावा, अशी मागणी पत्रकात करण्यात आलेली आहे.