आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षणावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:51 IST2020-08-31T12:51:12+5:302020-08-31T12:51:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण देतांना जिल्हा परिषद शिक्षकांना कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्या ...

आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षणावर चर्चासत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण देतांना जिल्हा परिषद शिक्षकांना कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्या सोडविण्यासाठी काय करता येईल यासह इतर विविध विषयांवर नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आयोजित चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले.
चर्चासत्रास सातारा येथील तंत्रस्रेही शिक्षक किरण शिंदे हे वक्ते म्हणून होते. प्रस्ताविकात गटशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी कोविड -१९ या जागतिक महामारी मध्ये सद्यस्थितीतून आपण सर्व जात असताना मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत, विद्यार्थी घरी आहेत.
या परिस्थितीत मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी राज्य स्तरावरून अभ्यास माला, दीक्षा अॅप , टिली मिली कार्यक्रम हे उपक्रम चालू आहेत. मात्र हे करत असताना काही मर्यादा, अडचणी आहेत त्यातूनही शिक्षक आॅनलाईन-आॅफलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. हे प्रयत्न अजुन नेमकेपणाने आणि दिशादर्शक होण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते किरण शिंदे यांनी आॅनलाईन आॅफलाईन शिक्षणातील अडचणी, आॅफलाईन माध्यम , समाज सहभाग, आॅनलाईन अध्यापन पद्धती यावर सादरीकरण करून शिक्षकासोबत चर्चासत्राच्या माध्यमातून सवांद साधला.
गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी मिनी स्कूल, वर्क शीट, विविध पद्धतींचा प्रभावी वापर, लोकसहभाग/पालक सहभाग या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक मुलांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे नियोजन करण्यात आले.
केंद्रप्रमुख वसंत पाटील यांनी आभार मानले. विस्तार अधिकारी सचिन गोसावी, एस .एन पाटील, डी. जी. वसावे, केंद्रप्रमुख रविकांत ठाकरे उपस्थित होते.
सूत्रसंचालन सोनल शिंदे यानी केले. कार्यशाळेस एकूण जि प शाळे मधील शिक्षक व क्षेत्रिय अधिकारी असे एकूण १८७ सदस्य सहभागी झाले होते.
नंदुरबार तालुक्याची सद्य स्थिती लक्षात घेता २५-२६% विद्यार्थ्यांच्या पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल आणि सुविधा आहेत याचा विचार करता प्रत्येक मुलापर्यत शिक्षण पोहचविण्यासाठी आॅनलाईन आणि आॅफलाईन या दोन्ही पद्धतींचा प्रभावी वापर सद्य स्थितीत गरजेचा आहे. कोविड- १९ परिस्थिती मध्ये तालुक्यामध्ये काम करत असलेल्या शिक्षक व पालकांना दिशा देण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले.