राज्यस्तरीय बाल परिषदेत श्रॉफ हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:22+5:302021-01-10T04:24:22+5:30
नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. यात तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती देणे, तंबाखूमुक्त परिसर व ...

राज्यस्तरीय बाल परिषदेत श्रॉफ हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची निवड
नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. यात तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती देणे, तंबाखूमुक्त परिसर व आरोग्यसंपन्न पिढी घडवणे या हेतूने या राज्यस्तरीय ऑनलाइन बाल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय बाल परिषदेसाठी नंदुरबार येथील हि.गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी मृदुला प्रशांत कासार, नेहल रवींद्र पाटील, निलाक्षी मनोज शेलार, कल्याणी बागुल, मिताली विशाल सोमवंशी तसेच शिक्षक प्रशांत बागुल यांची निवड करण्यात आली आहे.
प्राचार्या सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे तसेच सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक आदेश नदवीकर व नवनिर्माण संस्थेचे रवी गोसावी यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभत आहे.