आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून अशोक सूर्यवंशी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST2021-04-12T04:28:06+5:302021-04-12T04:28:06+5:30

२०१९ ते २० वर्षासाठी राज्यातून ३५ जणांना पुरस्कार जाहीर झाला असून, नाशिक विभागातील पाच जणांना हा पुरस्कार देण्यात येणार ...

Selection of Ashok Suryavanshi as Ideal Rural Development Officer | आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून अशोक सूर्यवंशी यांची निवड

आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून अशोक सूर्यवंशी यांची निवड

२०१९ ते २० वर्षासाठी राज्यातून ३५ जणांना पुरस्कार जाहीर झाला असून, नाशिक विभागातील पाच जणांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातून भादवड येथील अशोक सूर्यवंशी यांना आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी ३० मार्च रोजी शासन निर्णयाचे परिपत्रक जाहीर केले आहे. सूर्यवंशी यांनी भादवड येथे १४ वा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, सामाजिक परिवर्तन अभियान, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजना आदी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली होती. त्यांच्या निवडीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंधळ, डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, विस्तार अधिकारी दिलीप कुवर, सरपंच संजय वळवी, जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष रवींद्र वळवी, नवापूर तालुकाध्यक्ष दौलत कोकणी यांनी गौरव केला आहे.

Web Title: Selection of Ashok Suryavanshi as Ideal Rural Development Officer