जागा 16 हजार विद्यार्थी 21 हजार, अकरावी प्रवेशाची वाढली डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST2021-08-14T04:36:18+5:302021-08-14T04:36:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावी परीक्षेत प्रविष्ठ २१ हजार ७५ विद्यार्थ्यांपैकी अवघे दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अर्थात ...

जागा 16 हजार विद्यार्थी 21 हजार, अकरावी प्रवेशाची वाढली डोकेदुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दहावी परीक्षेत प्रविष्ठ २१ हजार ७५ विद्यार्थ्यांपैकी अवघे दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अर्थात २१ हजार ७३ विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यातील काही विद्यार्थी आटीआय आणि इतर अभ्यासक्रमाला गेले तरी अकरावीच्या उपलब्ध जागांपेक्षा अधिक विद्यार्थी असल्याने अकरावी प्रवेशाचा गुंता वाढणार आहे. त्यातच प्रवेशाची सीईटी देखील रद्द झाली आहे. दरम्यान, १४ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.
अकरावी प्रवेशचा गुंता आता सुटला आहे. सीईटी रद्द झाली आहे. १४ तारखेपासून नेहमीच्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. परंतु यंदा अकरावीच्या जागेपेक्षा पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बहुतेक ७० टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळालेली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना चांगले महाविद्यालय मिळावे अशी अपेक्षा लागून आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये चुरस राहणार आहे. गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया होणार असली तरी महाविद्यालयांची डोकेदुखी आतापासूनच वाढली आहे.
आटीआयच्या दोन हजार जागांकडेही कल
n साधारण गुणवत्तेेचेही अनेक विद्यार्थी यंदा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा अशा विद्यार्थी व पालकांचा ओढा हा आयटीआयकडे असल्याचे चित्र आहे.
n जिल्ह्यात शासकीय, खाजगी आयटीआयच्या जवळपास दोन हजार जागा आहेत. त्यातील चांगल्या ट्रेडसाठी विद्यार्थ्यांचा कल असतो. गुणवत्तेनुसार अशा ट्रेडला प्रवेश मिळतो.
n दहावीचा निकाल लागताच आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शासकीयसह चांगल्या शैक्षणिक संस्थेच्या आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला आहे.
n अनेक विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधीक टक्केवारी मिळाली आहे. त्यामुळे प्रवेशाच्या गुणवत्ता यादीची महाविद्यालयांची कटऑफ वाढणार आहेत.
n काही प्रतिष्ठित व विद्यार्थ्यांचा ओढा असलेल्या महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोटा असतो त्याकडेही अनेकांचा कल आतापासूनच आहे.
n २२ ऑगस्टनंतर पहिली गुणवत्ता यादी लागण्याची शक्यता असून त्यानुसार नियोजन करण्याच्या सुचना महाविद्यालयांना दिल्या आहेत.