निंबीपाडा येथे मालपाडा केंद्राच्या शालेय क्रीडा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:24 PM2020-02-19T12:24:26+5:302020-02-19T12:24:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : शालेय विद्यार्थ्यांसाठी निंबीपाडा ता.अक्कलकुवा येथे मालपाडा केंद्रांतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहे. यात ...

School sports competition at Malpada Center at Nimbipada | निंबीपाडा येथे मालपाडा केंद्राच्या शालेय क्रीडा स्पर्धा

निंबीपाडा येथे मालपाडा केंद्राच्या शालेय क्रीडा स्पर्धा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी : शालेय विद्यार्थ्यांसाठी निंबीपाडा ता.अक्कलकुवा येथे मालपाडा केंद्रांतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहे. यात एकुण १५ शाळांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सरपंच नेहा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारशी वसावे, केंद्र प्रमुख मनोज साळवे, शिक्षण विस्ताराधिकारी पी.जी. वळवी, गट शिक्षणाधिकारी पाटील, चंद्रसिंग वसावे, रेंहज्या वसावे, मधुकर वसावे, माजी सरपंच गारद्या वसावे, मुख्याध्यापक पी.टी. तडवी, वनसिंग वसावे, कैलास हाळे, रायसिंग वसावे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खो-खो, कबड्डी, लंगडी, गोणपाट शर्यत, धावण्याच्या शर्यतीत १०० मिटर व २०० मिटर यासह अन्य क्रीडा प्रकाराचा समावेश आहे. सुत्रसंचालन नितीन लेडवेयांनी केले तर आभार फुलसिंग वसावे यांनी मानले.

Web Title: School sports competition at Malpada Center at Nimbipada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.