शाळेत बाळगोपाळांना मिळणार आता चॉकलेट; ज्वारी, बाजरी नाचणीचा होणार वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 02:08 PM2024-03-18T14:08:26+5:302024-03-18T14:10:48+5:30

रोज चॉकलेट बार, तसेच विविध धान्यांचे बार विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे विद्यार्थीही खूष आहेत.

School guardians will now get chocolate; Sorghum, millet ragi will be used | शाळेत बाळगोपाळांना मिळणार आता चॉकलेट; ज्वारी, बाजरी नाचणीचा होणार वापर

शाळेत बाळगोपाळांना मिळणार आता चॉकलेट; ज्वारी, बाजरी नाचणीचा होणार वापर

लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार: विद्यार्थ्यांचे पोषण सुधारण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये आता बाजरी, ज्वारी व नाचणीचे चॉकलेट वितरित केले जात आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यांत हा उपक्रम राबविला जात असून त्यात खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील जळगाव, धाराशिव, नांदेड, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील पात्र शाळांमधील आदिवासी आणि आकांक्षित क्षेत्रात पोषक तत्त्वांचा पुरवठा करण्याकरिता त्यांचे वाटप केले जात आहे. त्या अंतर्गत या उपक्रमात नाचणीसह चॉकलेट पौष्टिक बार, ज्वारीसह मिश्र फळ बाजरी पौष्टिक बार आणि पीनट बटर बाजरी पौष्टिक बार बाजरी असे तीन प्रकारचे चॉकलेट वाटप करण्यात येत आहेत.  त्यासाठी वरील जिल्ह्यातील पात्र  शाळांची संख्या आणि इतर संबंधित माहिती जिल्ह्यांमधून आधीच गोळा करण्यात आली होती. 

रोज चॉकलेट बार, तसेच विविध धान्यांचे बार विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे विद्यार्थीही खूष आहेत.

चॉकलेट मिलेट न्यूट्रेटिव्ह बार विथ रागी (नाचणी)

  • इयत्ता पहिली ते पाचवी ३० ग्रॅम याप्रमाणे ८ दिवस तर इयत्ता सहावी ते सातवी ३० ग्रॅमप्रमाणे ८ दिवस याप्रमाणे वाटप करावयाचे आहे.
  • त्यानंतर मिक्स फ्रूट मिलेट न्यूट्रेटिव्ह बार विथ जवार (ज्वारी) इयत्ता पहिली ते पाचवी ३० ग्रॅम ९ दिवसांसाठी, 
  • तर इयत्ता सातवी ते आठवी ३० ग्रॅम ९ दिवस याप्रमाणे वाटप करावयाचे आहे; तसेच पीनट बटर मिलेट न्यूट्रेटिव्ह बार विथ बाजरा इयत्ता पहिली ते पाचवी ३० ग्रॅम ८ दिवस, तर इयत्ता सहावी ते आठवी ३० ग्रॅम ८ दिवस याप्रमाणे वाटप करावयाचे आहे.

Web Title: School guardians will now get chocolate; Sorghum, millet ragi will be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा