आधुनिकीकरणात सातपुडा कारखाना अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:50 IST2019-08-14T12:50:23+5:302019-08-14T12:50:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा कारखाना आधुनिकीकरण करण्यात सतत प्रय}शिल राहतो. अद्यापर्पयत शेतक:यांना अद्यावत माहिती देण्यासाठी स्वतंत्र ऊस ...

आधुनिकीकरणात सातपुडा कारखाना अग्रेसर
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सातपुडा कारखाना आधुनिकीकरण करण्यात सतत प्रय}शिल राहतो. अद्यापर्पयत शेतक:यांना अद्यावत माहिती देण्यासाठी स्वतंत्र ऊस विकास विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत ‘सातपुडा मिशन 100’ यशस्वीपणे राबविले जात आहे.
दरम्यान, प्रत्येक गटावर पजर्न्यमापक यंत्र देण्यात आले आहे. तसेच ऊस उत्पादक प्रत्येक शेतक:याला स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे माहिती पुरविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिली.
पुरूषोत्तम नगर येथील सातपुडा साखर कारखाना काळानुरूप अनेक बदल स्विकारत असून, त्या बदलाची माहिती वेळोवेळी शेतक:यांर्पयत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. आपल्या परिसरात किती पाऊस झाला याची उत्सुकता प्रत्येकाला असते. म्हणून कारखान्याच्या 22 गट कार्यालयात पजर्न्यमापक यंत्र देण्यात आले आहेत. या मापकाचे माप कसे घ्यावे व त्याचे महत्त्व काय आहे याबाबत मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत यांनी सर्व गट सुपरवायझरांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.
प्रत्येक गट कार्यालयातून केंद्रीय कार्यालयाला दैनंदिन पावसाची नोंद उपलब्ध होणार असून, या कार्यालयामार्फत प्रसिद्ध केले जाणार आहे. एवढेच कार्य नसून ती माहिती शासनालादेखील देण्यात येणार आहे. म्हणून आता आपल्या परिसरात किती पाऊस झाला याची दैनंदिन माहिती उपलब्ध होणार आहे.
सातपुडा कारखान्याचा कारभार पारदर्शी राहिला असून, जे ऊस उत्पादक शेतकरी सातपुडा कारखान्यास ऊस नोंद करतील, त्यांनी नोंद केलेला मोबाईल क्रमांकावर ऊसाच्या लागवडीपासून ते ऊस तोडणी, ऊस वजन व गाळपास पुरवठा झालेल्या ऊस बिलाची अद्यावत माहिती मोबाईल अॅपद्वारे देण्यासाठी कारखान्याचे संगणक विभागाचे मॅनेजर पंकज ससले काम करीत असल्याची माहिती पी.आर. पाटील यांनी दिली.